पाथर्डी - वाढती व्यसनाधीनता शिक्षण व
संस्काराचा अभाव कौटुंबिक संवादाच्या अभावामुळे तालुक्यात मुख कर्करोगाचे प्रमाण
वाढवून जिल्ह्यात कर्करोगाच्या बाबतीत तालुक्याचा क्रमांक खूप वरचा आहे तंबाखूजन्य
पदार्थांच्या सेवनाने पुरुषोत्त्वावर अनिष्ट परिणाम होत असल्याने वेगळीच गंभीर
सामाजिक समस्या वाढत आहे अशी माहिती ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर ललित गुगळे यांनी
दिली.
लायन्स क्लब तर्फे मुख कर्करोग जनजागृती
अभियान उपक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून
बर्ड संस्थेचे समन्वयक डॉ.दीपक देशमुख,अॅडवोकेट हरिहर गर्जे,पत्रकार राजेंद्र
सावंत तर अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश मंत्री होते.
शहर व तालुक्यातून तंबाखू सुपारी व अन्य
रसायन मिळून तयार होणारा मावा कल्याण नगर पुणे व मराठवाड्यातही पाठवला जाऊन या
व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असून शाळकरी मुले तरुण मुले महिलांमध्ये सुद्धा
मावा गुटखा तंबाखू सेवनासह धुम्रपानाचे प्रमाण चिंताजनक आहे शहरातील वैद्यकीय
व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या चर्चेतून मुख कर्करोगाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक
माहिती पुढे आल्याने सर्व डॉक्टरांनी मिळून याबाबत व्यापक अभियान जनजागृती
लोकसहभाग वाढण्याचा निर्णय सामाजिक बांधिलकीच्या भावनेने घेतला या मोहिमेत सहभागी
असलेले डॉक्टर भाऊसाहेब लांडे,डॉक्टर संदीप पवार,डॉक्टर सलमान शेख,डॉक्टर राहुल
देशमुख,डॉक्टर शिरीष जोशी,डॉक्टर दीपक देशमुख,डॉक्टर योगेश वाघचौरे,भाऊसाहेब गोरे,गणेश
भागवत,प्रमोद दहिफळे,राजेश काळे आदींनी उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉक्टर ललित गुगळे म्हणाले कि मुख कर्करोग बाबत वेळीच दक्षता व उपाय योजना हाती घेतली जात नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे निदान उशिरा होऊन रोगाचा फायदा वेगाने सुरू होतो मुख कर्करोग केवळ तंबाखूजन्य पदार्थांमुळेच होतो असे नसून अल्कोहोल पान सुपारी चुना यांचे मिश्रण तोंडाच्या स्वच्छतेची नियमित काळजी न घेणे यामुळे सुद्धा मुख कर्करोग होतो कर्करोगावर देशात अत्यंत वेगाने संशोधन सुरू आहे मात्र आज तरी कर्करोगाचे दुष्परिणाम पूर्णपणे रोखणे अत्यंत जिकिरीचे ठरले आहे.लायन्स क्लब च्या माध्यमातून आवश्यक ती जागरूकता व माहिती देण्याचा सेवाभावी उपक्रमात समविचारी सर्वच नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे कर्करोगाचा तालुक्यातील पहिला पाहता सेवाभावी वृत्तीच्या अनेक आरोग्य सेवकांची तातडीची गरज असून लायन्स क्लबच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ तालुक्याची सार्वजनिक जागृती चळवळ व्हावी यातून होणारी लोक जागृती अनेक पिढ्यांचा बचाव करणारी ठरणार आहे असे डॉक्टर गुगळे म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाऊसाहेब लांडे सूत्रसंचालन मनोहर गोरे तर डॉक्टर राहुल देशमुख यांनी आभार मानले डॉक्टर संदीप पवार यांनी उपक्रमाची विस्तृत माहिती दिली.
0 Comments