शेवगाव : उस्मानाबाद येथे दिं.२० ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुष व महिला
राष्ट्रीय खो - खो स्पर्धेसाठी वरूरचे रहिवाशी व शेवगावच्या डॉ. बाळासाहेब विखे
पाटील सीबीएसई स्कूलचे क्रीडाशिक्षक रमेश लव्हाट यांची पंचमंडळावर तर,लोकमान्य
हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण वाघ यांची फिजिओपदी (फिजिकल गाईड ऑफिसर)निवड झाली आहे .
लव्हाट यांनी
यापूर्वी ७ राष्ट्रीय शालेय तसेच भुवनेश्वर व भोपाळ येथील कुमार व कुमारी गटातील
राष्ट्रीय स्पर्धा आणि जवळपास ३२ राज्य स्पर्धेत पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली
आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेवेतील व
शेवगावच्या लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण वाघ यांची राष्ट्रीय स्पर्धेत
फिजिओ म्हणून निवड झाली आहे. उभयंतांनी यापूर्वी भुवनेश्वर व हिमाचल प्रदेश (उना)
येथील राष्ट्रीय स्पर्धेत काम पाहिलेले आहे. दोघेही ३० वर्षापासून शेवगाव स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विविध
शाळांमधील खेळाडू घडवण्यात कार्यरत आहेत.आजमितीला सुमारे १५० मुले - मुली
त्यांच्या मार्गदर्शनाखाली खो - खो चा सराव करत आहेत.आतापर्यंत त्यांनी अनेक
राष्ट्रीय तसेच शेकडो राज्यस्तरीय खेळाडू महाराष्ट्रला दिले आहेत.त्यांना भारतीय
खो- खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव ,पंचमंडळ समन्वयक प्रशांत पाटणकर,महाराष्ट्र खो-खो
असोसिएशनचे अध्यक्ष संजीव बाबाराजे निंबाळकर ,कार्याध्यक्ष सचिन गोडबोले , उपाध्यक्ष अँड.
अशोक पितळे ,सचिव अँड . गोविंद शर्मा ,तांत्रिक समितीचे नरेंद्र कुंदर,क्रीडा उपसंचालक
अनिल चोरमले आदींचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष
डॉ. राजेंद्र विखे पा.,शेवगाव आयुर्वेदिक कॅम्पसचे कार्यकारी अधिकारी डॉ. युवराज नरवडे, स्कूल डायरेक्टर
विदुल परांजपे, सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या वर्षा दारकुंडे आदींनी कौतुक व
अभिनंदन केले.
0 Comments