शासनाने चाऱ्याची तरी मदत करावी ! शेतकऱ्यांची मागणी !

करंजी - आमच्या जनावरांना कोणी चारा तरी द्या,लंम्पी रोगाने जनावरे मरत असताना, शेतकऱ्यांचे पशुधन वाचावे म्हणुन देशातील पहिले लंम्पी क्वारंटाईन टाईन सेंटर उभे करण्यात आले पण तेथील जनावरांना खरी गरज चाऱ्याची असल्याने शासनाने किमान चाऱ्यासाठी तरी मदत करावी,अशी मागणी क्वारंटाईन सेंटरमधील शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यात लंम्पी रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात दररोज ५० च्यावर जनावरे या रोगाने बळी पडत आहेत. शेतकर्‍याच्या दारातील पशुधन संकटात आहे. अशातच तिसगावजवळ या रोगाची लागण झालेल्या जनावरांसाठी सामाजिक कार्यकर्त शरद मरकड, उद्योजक बाळासाहेब कर्डीले, भोसेचे सरपंच विलास टेमकर, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलाताई म्हस्के,अशोक टेमकर,उपसरपंच संदिप साळवे, सागर कराळेसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून हे क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले. हे क्वारंटाईन सेंटर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. जगदीश पालवे यांचे मार्गदर्शनाखाली जनावरांना वाचविण्यासाठी शासनाच्या मदतीशिवाय प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत. या क्वारंटाईन सेंटरमध्ये १०० च्यावर जनावरे आहेत. सेंटरमधील जनावरांना शासनाने किमान चाऱ्याची तरी सोय करावी अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.पश्चिम भागातील भोसे, खांडगाव, जोहारवाडी, डमाळवाडी, घाटसिरस आदि अनेक गावातील जनावरांना मोठ्या प्रमाणात लंम्पीची लागण झाली आहे. 

क्वारंटाईन टाईन सेंटरमध्ये भरती केलेल्या जनावरांना तालुक्यातील पशुवैद्यकीय डाॅक्टर दररोज मोफत औषधोपचार व सेवा देत आहेत. अनेक जनावरे या सेंटरमधुन बरी होत आहेत. मात्र येथील पिडीत जनावरांना मुबलक चारा मिळत नाही. शासनाने या सेंटरला किमान चाऱ्याची तरी मदत करावी, तसेच राज्यातील मोठ-मोठे देवस्थान, दानशुर व्यक्तींनी पुढे येवुन मदत करावी असे आवाहन या भागातील व क्वारंटाईन टाईन सेंटरमधील भागवत तुकाराम शेळके,शेख इरफान सिराज,कासार विजय बाबासाहेब, बापूसाहेब कचरे, शिवाजी कोंडीचा पालवे, वैभव रामभाऊ गिते, शामराव भानुदास गिते, खंडू पंढरीनाथ गर्ज, मिठु सूर्यभान कोंगे, आदिनाथ कोंगे, कानिफनाथ भापकर, ज्ञानदेव घुले, म्हातारदेव तात्याबा पोटेसह अनेक शेतकर्‍यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments