खरडगावमध्ये शॉर्टसर्किट; दहा एकरातील ऊस जळून खाक


शेवगाव : तालुक्यातील खरडगाव येथे मंगळवारी (दिं १) रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच शेतकऱ्यांचा दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. 

या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या आगीत ज्योती कल्याण बोडखे (ग.नं.४८०), साहेबराव किसन काकडे (ग.नं.४८१/१), गोरक्ष काशिनाथ काकडे (ग.नं.४८१/२), एकनाथ वामन लवांडे (ग.नं.४८१/३) व राम आश्राजी काकडे (ग.नं.४८२) या शेतकऱ्यांचा उभा ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments