पाथर्डी बस स्थानकातून चोरट्यांनी गंठन लांबवले


पाथर्डी – शहरातील नवीन बस स्थानकातून  प्रवासी विकास पोपट मरकड यांच्या पत्नीच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन चोरून नेहले असून याबाबत पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी नुसार हकीगत अशी कि,प्रवासी विकास पोपट मरकड रा.धामणगाव हे त्यांच्या पत्नी सह नवीन बस स्थानकातून पुणे येथे जाण्यासाठी एस.टी.बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरांनी फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील ९०,०००/- नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे साखळीचे गंठन चोरुन नेहले असून याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.  


Post a Comment

0 Comments