भाऊसाहेब ढोले यांना शॉर्य पदक मिळाल्या
बद्दल त्यांचा चैतन्य ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या
वेळी सतीश मुनोत,तुकाराम महाराज चन्ने,शिवशंकर राजळे,गोकुळ दौण्ड,डॉ. दीपक देशमुख,बंडू बोरुडे,पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,प्रवीण पाटील,श्रीकांत डांगे,अनंत ढोले,अजिंक्य खेडकर,विजयकुमार ढोले,नारायण एकशिंगे,डॉ.दीपक जायभाय,डॉ. सुहास
उरणकर,मुकुंद गर्जे,डॉ. अभय आव्हाड,डॉ. शिरीष जोशी व भाऊसाहेब ढोले यांचे माता
पिता कैलास ढोले,चंद्रकला ढोले आदी सह मान्यवर उपस्थित
होते. या वेळी बोलताना ढोले म्हणाले कि कौटुंबिक परिस्थिती खडतर असल्यामुळे मला
कोणतीही कोचिंग क्लास लावता आला नाही मात्र वडिलांनी नगर महापालिकेच्या स्पर्धा
परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आपण अभ्यास करून पहिल्या परीक्षेत सेलटॅक्स
इन्स्पेक्टर झालो तर त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी झालो. स्पर्धा परीक्षा
देताना जर यश आले नाही तर महत्वाची काही वर्ष वाया जात असल्याने या स्पर्धेला
आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते. वेळेचा सदुपयोग केला तर यशाला
गवसणी घालणे सोपे जाते. स्वप्ने पाहायला व इतरांना सांगायला शिका. जे तुमच्या
स्वप्नावर हसतील त्याचा खेद बाळगू नका. यश मिळाले कि सर्वजण तुमचा आदर करतील हे
निश्चित असल्याने दरवेळेस यशाची स्वप्ने पहा असे शेवटी ढोले म्हणाले. प्रास्ताविक
अनंत ढोले सूत्रसंचालन उद्धव काळापहाड तर आभार विजयकुमार ढोले यांनी मानले.
0 Comments