पाथर्डी तालुक्याला एम.आय.डी.सी मिळावी यासाठी आंदोलन

पाथर्डी - तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा व भवितव्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेला प्रस्थापितांकडून जाणून बुजून दुर्लक्षित केला गेलेला एमआयडीसी च्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचे कार्य बुधवारी पाथर्डी येथील तीन हात चौक येथे हाती घेण्यात आले.

या आंदोलनासाठी पूर्व भागातीलभागातील युवा कार्यकर्ता पंकज पालवे यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्ष नेत्यांना निमंत्रण देऊन सुरुवात केली. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सामाजिक नेतेप्राध्यापक सुनील पाखरे ,नागनाथ गरजे,किसन आव्हाड रामनाथ चव्हाण यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या आंदोलनासाठी वचनबद्ध राहण्याची हमीपत्र दिले,सुनील पाखरे म्हणाले की या आंदोलनासाठी वेळप्रसंगी हुतात्मा होण्याची वेळ आली तरी डगमगणार नाहीकारण हा पाथर्डी करांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे,पाथर्डी करांचा कोयता आम्हाला दूर करावयाचा आहे, पाथर्डी करांना पोटापाण्यासाठी खूप दूरवर जावे लागते त्यामुळे हा तालुक्याच्या दृष्टीने जीवन मरणाचा प्रश्न आहेशासन पाथर्डीकरांसाठी नेहमीच उदासीन राहिले आहे प्रस्थापितांनी प्रस्थापितांनी पाथर्डी तालुक्याचे वाटोळं करण्यास मागे पुढे पाहिले नाही,

आम्ही या आंदोलनाद्वारे एमआयडीसी कृती समिती स्थापन करत असून या कृती समितीचे अध्यक्ष पद तालुका काँग्रेस अध्यक्ष नासिर शहानवाज शेख यांनी स्वीकारावे असा ठराव मांडला त्या सर्वांनी एकमताने अनुमती दिली यावेळी किसन आव्हाड यांनी सांगितले की शासन जाणून-बुजून पाथडी तालुका वासियावरअन्याय करत असून , तरी करावं नेहमी उपेक्षित राहण्याची पाळी येते परंतु यापुढे आता आम्ही आमच्या प्रश्नासाठी सर्वजण मिळून संघर्ष करत राहू,एक दिलाने एकमताने संघर्ष केला जाईल,

कृती समिती अध्यक्ष नासिर शहानवाज शेख यांनी सांगितले की सर्वांना विश्वासात घेऊन ,बरोबर घेऊन हे आंदोलन उभारले जाईल सर्व पातळीवर तांत्रिक बाजूचा अभ्यास करून प्रशासकीय राजकीय सामाजिक पातळीवर हे आंदोलन उभारले जाईल कारण पाथर्डी तालुका अत्यंत दुर्गम असून डोंगराळ व दुष्काळी असून येथील सुशिक्षित बेरोजगार हा रोजगारासाठी पूर्ण राज्यांमध्ये सैर वैर पळत असून येथील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, लोकांच्या व्यवसायांचा प्रश्न ,व्यापार व नोकऱ्यांचा प्रश्न एमआयडीसीमुळे मार्गी लागणार असून पाथर्डी तालुक्यामध्ये एमआयडीसीला पोषक वातावरण आहे कारण तालुक्यामधून राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग हे जात असून पाण्याची उपलब्धता मोहरी तलाव आणि जायकवाडीच्या पाण्याच्या माध्यमातून होऊ शकते,य तालुक्यामध्ये कच्चामाल अत्यंत सहजरित्या उपलब्ध होतो किंबहुना जोपर्यंत पाथर्डी तालुक्यात एमआयडीसी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण शांत किंवा स्वस्थ बसणार नाही,

Post a Comment

0 Comments