भारतीय सैनिकामुळेच आपण सुरक्षित अन तेच खरे हिरो – श्रीमंती कोकाटे

                                 

करंजी - जवान कधीही निवृत्त होत नसतात, जवान साधे आणि सरळ असतात, आपण सैन्यामुळेच सुरक्षित असुन तेच आपले खरे हिरो असल्याचे मत प्रसिध्द साहित्यिक व शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी येथील कारगिल युध्दातील योध्दे नायब सुभेदार नंदकिशोर अकोलकर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना व्यक्त केले. 

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नायब सुभेदार नंदकिशोर सुधाकर अकोलकर हे आज सैन्यातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना श्रीमंत कोकाटे म्हणाले, जवान कधीच निवृत्त होत नसतात, सीमेवर लढणाऱ्या जवानामुळेच आज आपण सुरक्षित आहोत, हेच खरे शिवरायांचे मावळे आहेत. जवानांचा जसा मोठा त्याग आहे, तसाच त्यांच्या पत्नी व आईचा ही मोठा त्याग असतो, आजही घरा-घरात शिवराय जन्माला येवु शकतात पण त्यासाठी जिजाऊ तयार होण्याची गरज आहे. मुंबईवर ज्यावेळी अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळी पोलिस व सैनिकांच्या भुमिकेमुळेच मुंबई जिवंत राहिली म्हणुन तेच आपले खरे हिरो असल्याचे सांगुन ते पुढे म्हणाले, आपण अमावस्येला अपवित्र मानतो पण शिवरायांनी आपल्या बहुतेक लढाया अमावस्येच्या रात्री केल्या आहेत. आज शिकलेले लोक पंचांग पहातात लाखो मैल दुर असलेला मंगळ खाली येवुन कसा त्रास देवु शकतो.पण ग्रहानुसार आपले जिवन जगत आहोत. शिवरायांच्या मनगटात ताकद होती, धैर्य होते त्यांनी कधीच पंचांग पाहुन कामे केली नाहीत. माणसावर संकटे नेहमी आली पाहिजेत संकटे संधी घेवुन येत असतात.चुकीच्या आहाराने आज मोठ-मोठ्या शहरातील ३५ टक्के लोकांना शुगरचा त्रास आहे. नायब सुभेदार नंदकिशोर अकोलकर यांनी देशातील अनेक ठिकाणी नोकरी करुन देशसेवेचे काम चोख बजावल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.


या कार्यक्रमास श्रीमंत कोकाटे, नायब सुभेदार नंदकिशोर अकोलकर,मराठा सेवा संघाचे रामकृष्ण कर्डीले,सरपंच बाळासाहेब अकोलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रफिक शेख, ॲड. मिर्झा मणियार,संभाजीराव पालवे, आदर्श शिक्षक विजय कारखेले, राजेंद्र पाठक, सुनिल साखरे, प्राचार्य सुनिल अकोलकर, जालिंदर वामन, बाबा गाडेकर, प्रकाश शेलार, विलास टेमकर, अशोक टेमकर,अभय गुगळे, डि.व्ही. अकोलकर,चेअरमन रमेश अकोलकर, व्हा. चेअरमन वसंतराव क्षेत्रे, नायब सुभेदार नंदकिशोर अकोलकर यांच्या सुविद्य पत्नी स्वाती व कुटुंबीय, परिसरातील माजी सैनिक, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक हजर होते.


Post a Comment

0 Comments