पाथर्डी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर भा.ज.प शिक्षण क्षेत्रातही जातियवादाची विषवल्ली पेरण्याचे धोरण
आखात असून पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणात पूरोगामी विचारसरणी बाजूला
सारण्याचे मोठे पर्यंत रचले जात असून जे पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने
घातक ठरणारे असून या सर्व प्रकारांना सरकार म्हणून भाजप व त्यांच्या विचारांचे
राज्यपाल एक प्रकारे राजमान्यताच देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर
जिल्हा निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी केला.
पाथर्डी येथील हिंद
वस्तीगृह येथे शनिवारी सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभिसभा सदस्य सार्वत्रिक
निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलच्या
उमेदवारंच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केदारेश्वर सहकारी साखर
कारखान्याचे अध्यक्ष अँड प्रतापराव ढाकणे होते. यावेळी पुण्याचे माजी
महापौर प्रशांत जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील
गव्हाणे,माजी नगरसेविका रूपालीताई ठोंबरे,पुणे विभागीय
अध्यक्षा संध्याताई सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,माजी नगरसेवक डॉ.
दीपक देशमुख,डॉ. राजेंद्र खेडकर,
शिवसेना ठाकरे गटाचे भगवान दराडे,वैभव दहिफळे, सितारा बोरुडे ,नंदकुमार डाळिंबकर, योगेश रासने, देवा पवार,दिगंबर गाडे,अजय पाठक,रवी पालवे, गणेश दिनकर, महेश दौंड,युसूफ खान,अनिल सांबळे,संतोष मेघुंडे, सचिन नागपुरे, अतिश नि-हाळी आदी अनेक महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते
काकडे पुढे म्हणाले,पुणे विद्यापीठ सिनेट
निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढत आहे,
निवडणूक अचानकपणे घोषित करून कुलपतींनी
धांदल उडून दिली त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान यादी संदर्भात अनेक हरकती
नोंदविल्या मात्र आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर कुलपतींनी करत एकाकी हरकतीची नोंद
घेतली नाही व निवडणूक जाहीर करून टाकली देशात भाजपकडून ज्या प्रकारे
एकाधिकाराशाहीचा वापर सुरू आहे त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात जातीवादाची
विषवल्ली पेरली जात आहे मात्र निदान या क्षेत्रात तरी पूरगामी विचारसरणी जिवंत
राहिली पाहिजे अन्यथा भाजप सत्तेचा गैरवापर करून इतिहासच पालटून टाकेल, प्रशांत
जगताप म्हनाले पुणे विद्यापीठाचे ६०० कोटींचा अर्थसंकल्प असून त्या माध्यमातून
विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक योजना राबविल्या जातात परंतु भाजपकडून विद्यापीठाची
अधिसभा ताब्यात घेऊन त्या माध्यमातून चुकीचे धोरणे अमलात आणल्याचा त्यांचा मनसुबा
आहे
बहुजन समाजाची
विद्यार्थी शिक्षणापासून हद्दपार हवीत हा त्यामागचा उद्देश असून जातिवादाची पेरणी
करण्याची त्यांची मानसिकता आहे नगर जिल्ह्यावर या निवडणुकीची मुख्य मतदार असल्याने
सुरक्षित मतदारांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून महाविकास आघाडीच्या
पॅनलला साथ द्यावी. प्रताप ढाकणे म्हणाले कि देशात सध्या इतिहासाची पाने पुसण्याचे
काम पडद्यामागून सुरू असून भाजप शासित अनेक राज्यात अभ्यासक्रमा बदलून त्यांच्या
सोयीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या माथी मारला जात आहे हे सर्व अतिशय भयंकर असून
पुरोगामी विचारसरणी कायम ठेवण्याची गरज आहे ज्या विद्यार्थ्याला फुलेंचे नाव
देण्याला विरोध भाजपकडून झाला त्याच विद्यापीठाची अति सभा ताब्यात घेण्यासाठी
भाजपचा प्रयत्न आहे आज पुणे विद्यापीठाची धोरणे ज्या पद्धतीने अक्षरशः रेटली जात
आहे ते चित्र भविष्यासाठी नुकसानदायक आहे मतदारांनी स्वाभिमान दाखवून त्या
प्रयत्नांना आळा घालावा प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर
राजळे यांनी केले सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी केले तर आभार बंडू पाटील बोरुडे
यांनी मानले.
0 Comments