करंजी - सर्वत्र प्राथमिक शाळा डिजीटल होत असतांना शासनाच्या मदतीशिवाय ग्रामस्थही लोकवर्गणीतून आपल्या गावातील प्राथमिक शाळेचा चेहरा-मोहरा बदलत असताना घाटसिरस येथील शाळेच्या खोल्या पाडल्या असुन विद्यार्थी मात्र मंदिरात व शेडमध्ये ज्ञानाचे धडे गिरवीत आहेत.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षण व सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून शासन प्रयत्नशील असते.पाथर्डी तालुक्यातील घाटसिरस गावातील विद्यार्थ्यांवर मात्र देवाच्या मंदिरात व पत्र्याच्या शेडमध्ये तसेच झाडाखाली बसुन ज्ञानाचे धडे गिरविण्याची वेळ आली आहे. शासनाने पाथर्डी तालुक्यातील घाटसिरस येथील प्राथमिक शाळेच्या खोल्या धोकादायक झाल्याचा अहवाल देत या शाळेच्या ६ खोल्या पाडण्यात आल्या. या खोल्या पाडताना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसण्याचा विचार करण्यात न आल्याने आज या शाळेतील व गावातील २५० च्यावर विद्यार्थ्यांचे भविष्यच अंधारात आहे.
शाळेच्या धोकादायक खोल्यांचे निर्लखन करताना
शाळेच्या खोल्या पाडण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करणे
महत्वाचे असल्याचा विसर प्रशासनास पडलेला आहे. येथील विद्यार्थ्यांना त्वरित शाळा
खोल्या उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी किसनराव पाठक, ग्रा.पं.सदस्य हिम्मत पडोळे, अनिल पाठक, नवनाथ पाठक, पंढरीनाथ चोथे, प्रशांत पाठक, पंढरीनाथ घाडगे, किसनराव गवळी, रवि राजपुरेसह अनेक पालक व ग्रामस्थांनी केली असुन ग्रामस्थ
आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत
किसनराव पाठक यांनी सांगितले की घाटसिरस येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मंदिरात व
झाडाखाली बसुन शिक्षण घेत आहेत. या शाळेतील २५० च्यावर विद्यार्थ्यांचे शालेय
शिक्षण धोक्यात असुन ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
0 Comments