ओवी ज्ञानेशाची स्पर्धेत नरसिंह पांचाळ प्रथम

बीड - ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारीत ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक ओव्यांची राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा 2022 ही अनोखी स्पर्धा मागील दोन वर्षापासुन ओवी ॲङ बाळासाहेब बोडखे आयोजित करीत आहेत. या वर्षी देखील अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आळंदी येथील श्री. नरसिंह मधुकरराव पांचाळ यांना ह.भ.प. सुदर्शन महाराज सांगवीकर, बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲङ एस.एम. नन्नवरे, यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षिस देवून गौरविण्यात आले. 

 या स्पर्धेत एकुण महाराष्ट्र्रातील 56 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. यामध्ये आळंदी येथील श्री. नरसिंह मधुकरराव पांचाळ यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. श्री. जगदिश परशुराम नरवडे, आष्टी यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. श्री. श्रीहरी महादेव पुरी आष्टी आणि श्री. योगेश गोरक्षनाथ गर्जे खिळद यांना तृतिय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेतील आणखी तीन स्पर्धेकांना उत्तेजनार्थ बक्षिस देवून गौरव करण्यात आला. त्यामध्ये बीड येथील कुमारी तनुजा किशोर मोरे, सागर शामराव गायकवाड श्रीगोंदा, सौ. ज्योती नवनाथराव गर्जे खिळद यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. 
 प्रथम क्रमांक पटकावणा-या स्पर्धेकास रोख रक्कम रू.5000/- ज्ञानेश्वरी ग्रंथ, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तिपञ देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकावणा-या स्पर्धेकास रोख रक्कम रू.3000/- ज्ञानेश्वरी ग्रंथ, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तिपञ देवून गौरविण्यात आले. तृतिय क्रमांक पटकावणा-या स्पर्धेकास रोख रक्कम रू.2000/- ज्ञानेश्वरी ग्रंथ, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तिपञ देवून गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिस पटकावणा-या स्पर्धेकास रोख रक्कम रू.1000/-, ज्ञानेश्वरी ग्रंथ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपञ देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आष्टी येथील नामाकिंत विधिज्ञ ॲङ परशुराम नरवडे (नाना) यांनी 12 अभ्यासु स्पर्धेकांना अर्थासह ज्ञानेश्वरी ग्रंथ सप्रेम भेट दिले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वयोवृध्द, तपोवृध्द ह.भ.प.गुरूवर्य सुदर्शन महाराज सांगवीकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲङ एस.एम.नन्नवरे, निष्णात मध्यस्थीकार ॲङ एन.एन.साबळे, प्रा. महादेव साबळे, श्री. बलभिमराव सुंबरे, गटविकास अधिकारी शेवगांव श्री. दहिफळे साहेब, ह.भ.प. निळकंठ तावरे महाराज केळसांगवी, येडेश्वरी संस्थानचे महंत ह.भ.प. श्री. आजीनाथ महाराज खिळदकर, वारकरी संप्रदायीक गायक श्री. बाबासाहेब गर्जे सर, शाहु बँकेचे संचालक ॲङ पि.बी. भोसले आदि मान्यवर हजर होते. 
 या कार्यक्रमात बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष ॲङ एस.एम. नन्नवरे, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज, ह.भ.प. निळकंठ महाराज, प्रा. महादेव साबळे, ॲङ एन.एन. साबळे, महंत आदिनाथ महाराज यांची समयोचित भाषणे झाली. स्पर्धेक योगेश गर्जे आणि आळंदी येथील प्रथम क्रमांक विजेते श्री. नरसिंह पांचाळ यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले. 
 या स्पर्धेचे आयोजक ॲङ बाळासाहेब बोडखे यांनी प्रस्ताविकपर मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, ज्ञानेश्वरीतील विज्ञानाचा अभ्यास मानवी कल्याणासाठी व्हावा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा वैज्ञानकि अंगाने देखील अभ्यासा व्हावा. ज्ञानेश्वरी वाचावी एवढेच पुरेशे नसुन ज्ञानेश्वरी अभ्यासणे आवश्यक आहे. अनेक शोध पाश्चिमात्यांनी लावल्याचे जाहीर केल्यावर आपल्याकडील तज्ञ ओरडतात की, हे तर आमच्या ज्ञानेश्वरीत माउलींनी 12 व्या शतकात सांगीतले आहे. मग प्रश्न असा आहे की, ते आपण का अभ्यासले नाही. ते अभ्यासले जावे यासाठी ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी याचा सर्वांनी नित्य जीवनात अभ्यास करावा असे आवाहन करण्यात आले. 
 या कार्यक्रमाचे सुञसंचालन वागभुषण ह.भ.प. देविदास महाराज केले. या प्रसंगी ॲङ गणेश कुलकर्णी, प्रा. नरवडे सर अंमळनेर, प्रा. योगेश देशपांडे आष्टी, तसेच खिळद येथे तरूण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपसरपंच भाउसाहेब गर्जे, डॉ. श्रीराम गर्जे, बाळासाहेब गर्जे, दत्तु गर्जे, अशोक गर्जे, शहादेव गर्जे, किरण गर्जे, अंबादास गर्जे, अनिल वनवे, रामा गर्जे, नारायण गोल्हार, बाबासाहेब गर्जे, सुरेश आघाव, सचिन गर्जे, इंजि. अमोल बोडखे, भागवत बोडखे, ॲङ नितीन बोडखे आणि नवनाथ गर्जे, भाउसाहेब साळुंके, पाटण येथील वेदमुर्ती आडकर देवा यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमात खिळद व आष्टी तालुका तसेच आळंदी हुन आलेले अभ्यासक हजर होते. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक ॲङ बाळासाहेब बोडखे, वागभुषण ह.भ.प. देविदास महाराज, श्री. पांडुरंग गर्जे यानी आलेल्या सर्वांचे आभार मानुन पुढील वर्षी स्पर्धा आयोजित होणार असल्याचे जाहीर केले. 

Post a Comment

0 Comments