कामचुकार शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, बदलीसाठी उपोषणाचा इशारा !

करंजी -प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यावर शिक्षकाचा दर्जा ठरविण्यात येतो,करंजी येथुन जवळच असलेल्या कान्होबावाडी प्राथमिक शाळेतील शिक्षक सुपेकर यांच्या मनमानी वागण्यामुळे या प्राथमिक शाळेत ७ विद्यार्थी शाळेत राहिले आहेत,ग्रामस्थांनी या शिक्षकाच्या बदलीची मागणी केली असुन बदली न झाल्यास सरपंचासह ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. 
प्राथमिक शाळेतील दर्जा पाहुन पालक आपल्या पाल्यास त्या-त्या शाळेत पाठवितात असतात. अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक असुनही त्या शाळेत शिक्षकांची संख्या शिक्षण विभाग वाढवुन देत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. पाथर्डी तालुक्यातील कान्होबावाडी प्राथमिक शाळेतील शिक्षक सुपेकर हे शाळेत वेळेवर येत नाहीत, विद्यार्थ्यांना शिकवीत नाहीत, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेस कधीच हजर राहात नाहीत, पालकांशी उध्दट वागणे,याशिवाय विद्यार्थ्यांना शिकविणेच त्यांना आतापर्यंत जमले नसल्याने या शाळेत फक्त ७ विद्यार्थी राहिले आहेत. तरीही या शाळेत ७ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची नेमणुक करण्यात आलेली आहे. या शाळेत शिक्षक येत नाहीत, मुलांना शिकविले जात नसल्याने मागील आठ दिवसात ४ ते ५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे दाखले या शाळेतुन काढुन नेले आहेत. या शिक्षकांची ग्रामस्थांनी व पालकांनी अनेकवेळा शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांकडे तसेच जिल्हा परिषदेकडे तक्रार करुनही या शिक्षकांवर काहीच कारवाई होत नसल्याने करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र अकोलकर, अर्जुन आबासाहेब अकोलकर, भगवान गणपत अकोलकरसह अनेक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा एका निवेदनाव्दारे दिला आहे.७ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नेमणुक या शाळेवर आहे. या शाळेतील शिक्षक सुपेकर हे शाळेत शिकवीत नसल्याने शाळेत ७ विद्यार्थी राहिले आहेत. या शिक्षकांची येथुन त्वरित बदली करण्यात यावी असे करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments