करंजी - पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभुळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैजनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार ज्योती संतोष घोरपडे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या.
पाथर्डी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवुन आज त्यांचा निकाल लागला. पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील ३९ गावे राहुरी मतदार संघाला जोडलेली आहेत. या पश्चिम भागातील तिसगाव, वैजुबाभुळगाव आणि कोल्हार या तिनच गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. वैजुबाभुळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैजनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार ज्योती संतोष घोरपडे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. तर सदस्य म्हणुन घोरपडे महेश बाबासाहेब, घोरपडे सुनिता सिदु, भवार मिरा रंगनाथ, लोहकरे रावसाहेब म्हातारदेव, गुंजाळ सुरज राजेंद्र, गुंजाळ सुजाता सुधाकर विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक घोरपडे, शाम लोहकरे, भरत घोरपडे, अशोक लोहकरे,संतोष घोरपडे, रावसाहेब लोहकरे, नामदेव नरवडे,आप्पासाहेब वांढेकर, शेखर गुंजाळ,बबनअण्णा गुंजाळ,सुधाकर गुंजाळ, सुरज गुंजाळ, किशोर गुंजाळ,अनिल भवार, उद्धव नरवडेयांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments