रवी फाटकेंची एक्साईज सब इन्स्पेक्टरपदी निवड

शेवगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ' ' मध्ये सामनगाव, (ता.शेवगाव) येथील रवी शिवाजी फाटके यांची एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क विभागात) सब इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी शिवाजी फाटके यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी शेवगावच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जिद्द, चिकाटी व दृढ आत्मविश्वासाच्या बळावर आपण हे यश संपादन केल्याचे श्री.फाटके यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments