जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न

पाथर्डी - जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच बाबूजी आव्हाड महाविद्यालय व श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वर्षे मुले या वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बाबुजी आव्हाड महाविद्यालय आणि श्री विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी या शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे म्हणाले, की पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात अभय आव्हाड यांच्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये संधी प्राप्त होत आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धेचे आयोजन व नियोजन उत्कृष्ट केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी श्रीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीशभाऊ गुगळे म्हणाले, की क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकास , खेळाडूमध्ये आत्मविश्वास तसेच जय- पराजय पचवण्याची क्षमता विकसित होते. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत खिलाडूवृत्तीने खेळावे असे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या.  

संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, कुस्ती सारख्या क्रीडा प्रकारामुळे पाथर्डी तालुक्याला महाराष्ट्रात वैभव प्राप्त झाले आहे. खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांच्या शालेय जडणघडणीत यासारख्या स्पर्धा अत्यंत प्रेरक ठरतात. यापुढेही विविध क्रीडा स्पर्धा विद्यालयात आयोजित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे ते शेवटी म्हणाले.  यावेळी पाथर्डी शहरात व तालुक्यात कुस्तीची परंपरा पुढे नेणाऱ्या जुन्या नामवंत मल्लांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सुभाष बोरुडे, त्रिंबक हंडाळ, राजेंद्र सोनटक्के, शिवाजी शिरसाट, बाळासाहेब शिरसाट, मामा आरगडे, लक्ष्मण डोमकावळे, दत्तू पवार, तुकाराम पवार, बाळासाहेब दराडे आदींचा समावेश होता. याप्रसंगी कलाशिक्षक राठोड दीपक राठोड सर यांनी रेखाटलेली मल्लांच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील ४२७ खेळाडूंनी सहभाग घेतला या सर्व खेळाडूंना स्नेहभोजन व इतर सर्व सुविधा पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने पुरविण्यात आल्या.

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, जि. प.सदस्य राहुलदादा राजळे, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, श्रीतिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश शेठ गुगळे ,मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे ,भगवानराव दराडे, प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे, प्रा.रमेश मोरगावकर, रविंद्र वायकर, सचिन वायकर, बबनराव सबलस,महेश बोरुडे, पप्पूशेठ नरवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिरसाट,सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके तर आभार मुख्याध्यापक शरद मेढे यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments