करंजी - आजचे युग हे विज्ञानवादी युग असल्याने विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात विज्ञानावर आपले लक्ष केंद्रित करावे असे मत महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील माहिती विस्तार शास्त्रज्ञ डाॅ. आनंद चवई यांनी येथील श्री नवनाथ विद्यालयात आयोजित केलेल्या गणित, विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावर गणित व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ. आनंद चवई यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डाॅ.चवई पुढे म्हणाले,आजचे युग हे विज्ञानवादी युग आहे, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी,शालेय जिवनातच संशोधक वृत्ती बाळगावी, शालेय जिवनात जिज्ञासा निर्माण झाल्यास त्यातुन मोठे वैज्ञानिक निर्माण होतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहिले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देवुन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमास करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल अकोलकर, पर्यवेक्षक रविंद्र भापसे उपस्थित होते. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी स्वप्निल लवांडे, श्रीमती मोहिनी अकोलकर, गणेश अकोलकर, चंद्रकांत गायकवाड, संदिप चव्हाण तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन स्वप्निल लवांडे यांनी केले तर आभार श्रीमती मोहिनी अकोलकर मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, विश्वस्त बाळकृष्ण मरकड, अरविंद आठरे, चंद्रकांत म्हस्के यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments