किंगमेकर अरुणआठरे

 

माणसे आजारी पडल्यानंतर डाॅक्टरकडे जातात, गोळ्या, औषधे घेवुन बरेही होतात. काही औषधे गोड असतात तर काही औषधे कडु असल्याचा अनुभव जवळ-जवळ सगळ्याच माणसांना आलेला असतो. मात्र कडु लागणारी औषधे नेहमीच गुणकारी व प्रभावी असल्याचा अनुभव दुखण्यात प्रत्येक माणसाला आलेला असतो. असाच काहीसा अनुभव प्रत्येक माणसाला आयुष्य जगताना येत असतो. स्पष्ट, खरे आणि तोंडावर बोलणारी माणसे समाजाला आवडत नाहीत, खरे, स्पष्ट, तोंडावर बोलणार्‍या माणसाचा तात्पुरता राग येत असला तरी खरी कामाची माणसे हिच असतात. 
कडु औषधाप्रमाणे गुणकारी असतात, दुर्दैवाने समाजाला हे पटत नसल्याने कामाची खरी माणसे मागे राहिली आहेत आणि तोंडावर गोड-गोड बोलुन समाजाचा घात करणारी माणसे पुढे येत आहेत.असेच काहीसे व्यक्तीमत्व असलेल्या अरुणसर आठरे पाटलांचा आज वाढदिवस आहे. तसे पाहिले तर शैक्षणिक, सामाजिक, राजकिय क्षेत्रात भरीव काम असणारे अरुणसर आठरे हे परिसराचे नव्हे तर तालुक्याचे नेतृत्व करु शकणारे व्यक्तीमत्व पण स्पष्ट बोलणे, खोटे सहन न करणे, तोंडावरच परखड मत व्यक्त करणे हे या लबाड समाजाला आवडले नसल्यानेच अरुणसर आठरे यांचे नेतृत्व फारसे बहरु शकले नसल्याची खंत आज अनेकांना वाटते. 
मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेत ते काम करित असताना शिक्षक, पालक, व विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांनी नेहमीच समजुन घेवुन सोडविल्या आहेत.पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम भागाला वांबोरी चारीव्दारे पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी मोठा लढा उभारुन या भागाला पाणी मिळवुन देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान या भागातील कष्टकरी शेतकरी कधीच विसरणार नाहीत यात तिळमात्र शंका नाही, "किंग होण्यापेक्षा किंगमेकरची" भुमिका त्यांना जास्त आवडल्याने अनेक आमदार-खासदार,जि.प. पं.स. सदस्यांचे भवितव्य ठरविण्यात आजही त्यांची भुमिका महत्वाची असते. या परिसरातील अशा किंगमेकरच्या वाढदिवसानिमित्त अरुणसर आठरे पाटलांना अनंत शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments