पाथर्डीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून डी.जे.चा दणदणाट सुरूच .....!

 

पाथर्डी - सध्या शहरात आवाजाच्या मर्यादा ओलांडून डीजे चा दणदनाट चालू असून त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय यांचे आवाजाच्या मर्यादा व डी जे बंदीच्या आदेशाची संपूर्णपने अवमान होताना दिसून येत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन डी जे च्या दनदनाटाकड़े  डोळे झाकुन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बाहेर गावच्या सुसज्ज डी जे पथक शौकीन लोकांकडून शहरात पाचारण करण्यात येत आहेत आवाजाच्या मर्यादा ओलंडून रात्री उशिरापर्यंत अष्लील गाणे वाजवुंन धींगाना घातला जात आहे त्यामुळे लहान मुले, आजारी रुग्ण, वयोवृद्ध यांना अतिशय त्रासाला सामोरे जावे लागत असून सार्वजनिक शांतता धोक्यात आली आहे.
आला बाबुराव आता आला बाबुराव .... बाई वाड्यावर या ..... यासारख्या अनेक बीभत्स व अश्लील गाण्यांनी शहरातीचे सांस्कृतीक वातावरण नष्ट होऊ पहात आहे.शहरात अवेळी तसेच आवाज मर्यादेच्या नियमांची पायमल्ली करून वाजनारा डी जे सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलीस प्रशासनाला फोनवर कळवुंन देखील काहीच कारवाई होत नसल्यामुळे '' धरल तर चावतय अन सोडल तर पळतय'' अशी काहीशी अवस्था पाथर्डी करांची झालीय.

पाथर्डीमध्ये कायदा व सुव्यवस्था रामभरोसे असून पोलिस प्रशासनाकडून सर्व काही आलबेल असल्याचा देखावा केला जात आहे.पालिका हद्दीत व हद्दीला लागून एकूण आठ मंगलकार्यालये असून शहरात काही ठिकाणी मंदिरातही लग्न व इतर मंगलकार्य पार पाडले जातात. बहुतेक मंगल कार्यालये लोकवस्ती मधे असून या मंगल कार्यालया मधील विवाह सोहळ्यात व भर रस्त्यावर मोठमोठ्या आवाजात मद्यधुंद तरुण बिनधास्त डी जे च्या ठेक्यावर नाचत असून त्यामुळे अनेकदा रस्त्यात ट्रॅफिक जॅम होवून प्रवाश्याना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. न्यायालयापासून जातांनाही डी जे मोठमोठ्या आवाजात वाजवल्यामुळे न्यायालयीन कामकाजात अनेकदा अडथळा येत आहे.शाळा,कॉलेज,सरकारी कार्यालये,हॉस्पिटल,रहिवासी भागातच नियमांची पायमल्ली करून मोठ्या आवाजात डी जे वाजवल्यामुळे शहराचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.  

शहरातील लोकवस्तीत असणारे आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालय,स्वामी समर्थ मंगल कार्यालय या मंगल कार्यालयांनी पालिकेची परवानगी घेतली आहे का ? मंगल कार्यालये पालिकेचा कर भरतात का ? रात्री अपरात्री लोकवस्तीत डीजे वाजवून शांतता भंग होत असल्यास पोलिसांची जबाबदारी काय ? या प्रश्ना भोवती पाथर्डी शहरातील शांततेचे उत्तर फिरत आहे.

यापूर्वी तत्कालीन शेवगाव परीक्षेत्राचे पोलिस अधिकारी यांनी पाथर्डी शहरातील लोकवस्तीतील डी जे बंद करण्याच्या दृस्तिकोनातून मंगल कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे सांगितले होते तसेच पोलिस अधीक्षकानी न्यायालयाच्या आदेशाचे पालन व शांतता अबाधित राहन्याच्या दृष्टिकोनातून डीजे वाजल्यास डीजे जप्त करण्याचे आदेश काढले होते परंतु या आदेशाचा स्थानिक पोलिसाना व गोपनीय विभागला विसर पडलेल्याचे दिसून येत आहे. पालिका हद्दीतील मंगल कार्यालये यांच्याकडून डीजे न वाजवण्याचे प्रतिज्ञापत्राचे सर्रास उल्लंघन होत असून न्यायालयाच्या डी जे बंदीच्या आदेशाचा पोलिस प्रशासनाकडूनच अवमान होताना दिसून येत आहे. त्यामुळे डीजेच्या दणदणाटाला कोण लगाम घालणार हा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.


Post a Comment

0 Comments