करंजी - पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागास वरदान ठरलेल्या वांबोरी
चारीच्या विजेच्या बिलासंदर्भात आपले सरकार असताना आपण कधीच अडचण येवु दिली
नसल्याचे मत माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात यावर्षीही कमी पाऊस झाला. वांबोरी चारीला
सुटलेल्या पाण्यामुळे या भागातील बरेच तलाव भरले होते. त्यामुळे या भागातील
पिकांना जीवदान मिळाले होते. वांबोरी चारीला अतिरिक्त व ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात
आले होते.त्यामुळे वांबोरी चारीचे या भागातील हक्काचे पाणी शिल्लक आहे. या भागातील
भरलेल्या तलावातील पाणी कमी होत असल्याने उन्हाळ्यात या भागात वांबोरी चारीचे पाणी सोडण्यात यावे अशी
मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगलताई म्हस्के व या भागातील
शेतकऱ्यांनी केली होती. परंतु वांबोरी चारीचे विजेच्या बिलाची थकबाकी १ कोटी ३६
लाखाच्यावर गेल्याने महावितरणने या योजनेचा विज पुरवठा खंडीत केला आहे. या विज
बिलासंदर्भात आपण लक्ष घालुन तोडलेले विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सौ.
म्हस्के यांनी केल्यानंतर बोलताना आमदार तनपुरे म्हणाले, आपले सरकार असताना या योजनेच्या बिलासंदर्भात आपण कोणतीही अडचण येवु दिली नाही.
प्रसंगी या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहुन या योजनेचे बील शासनास
भरण्यास भाग पाडले. आम्ही सत्तेवर असताना शेतकर्यांनी विजेचे बिल भरु नये असे सांगणारेच आज मात्र
शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडीस असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंगलताई
म्हस्के,राजेंद्र म्हस्के,पृथ्वीराज आठरे,संतोष आठरे,अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, गणेश म्हस्के, गणेश भापसे, ज्ञानेश्वर रांधवणे,बबनराव आठरेसह अनेक मान्यवर हजर होते.
वांबोरी चारीच्या थकीत वीजबिलासंदर्भात आपण लक्ष घालुन या योजनेव्दारे या
भागाला उन्हाळ्यात कसे पाणी मिळेल यासाठी निश्चित प्रयत्न करु असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी आश्वासन दिले.तसेच पाथर्डी तालुक्यातील या दुष्काळी भागाला
वरदान ठरलेल्या वांबोरी चारी योजनेच्या थकीत विज बिलासंदर्भातील जिव्हाळ्याच्या
प्रश्नात आमदार तनपुरे यांनी लक्ष घालावे
अशी मागणी कौडगाव-निंबोडी-त्रिभुवनवाडी
सरपंच मंगलताई म्हस्के यांनी केली आहे.
0 Comments