पाथर्डी - मोहटादेवी देवस्थान येथे शांकभरी
नवरात्रोत्सवाची सांगता पारंपारिक उत्साहात व वेदमंत्राच्या जयघोषात झाली.
राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी दिवसभरात श्री मोहटादेवी चे दर्शन घेतले.
सप्तशती पाठांची पुर्णाहुती होमहवनाने झाली. यावेळी सुवासिनी व कुमारिका पूजन
करण्यात आले.
देवस्थानचे चेअरमन
तथा अहमदनगर चे जिल्हा न्यायाधीश श्री. सुनील गोसावी, सौ. निता गोसावी
यांचे शुभहस्ते देवीची सपत्नीक महापुजा व होमहवन करुन वेदमंत्राच्या घोषाने परिसर
दुमदुमला.देवस्थानमार्फत वासंतिक,
शारदीय व शाकंभरी अशी तीन नवरात्रे
साजरी होतात. शाकंभरी नवरात्रोत्सवामध्ये रोज पारंपारिक उत्सव, त्रिकाल, आरत्या, सुवासिनी पूजन, अन्नदान झाले.
शाकाहार महात्म्य व उपयोगिता याबाबतचे वर्णन देवी महात्म्य मध्ये सांगून शाकंभरी
पौर्णिमेशी त्याचा संबंध आहे. शाकंभरी पौर्णिमेला गावोगावच्या सुवासिनी विविध
प्रकारच्या पालेभाज्या व पुरणपोळीच्या महानैवेद्य देवीला आणतात. नवसाची पुर्ती
झाली म्हणुन सवाष्णी जेवू घालण्याची परंपरा आहे.
औरंगाबाद, बीड, पुणे, नाशिक, कल्याण, मुंबई यांसह
राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त तथा दिवाणी
न्यायाधीश श्रीमती आश्विनी बिराजदार, श्री शाम वाडकर तहसिलदार, विश्वस्त अॅड.
श्री. कल्याण बडे, श्री. बाळासाहेब दहिफळे, श्रीमती अनुराधा केदार- फुंदे, डॉ श्रीधर देशमुख व
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कर्मचारी वृंद
यांनी स्वागत केले. वे.शा.संपन्न श्री. नारायणदेवा सुलाखे खोकरमोहकर, श्री. भूषण देवा, श्री. भास्कर
देशपांडे, श्री. विकास क्षिरसागर, श्री. भगवान जोशी यांनी पौराहित्य
केले.शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पाथर्डी येतील प्रज्ञाचक्षु मुकुंद महाराज
जाटदेवळेकर यांच्या श्रुतिमाऊली वेदपाठशाळेतील अध्यापक व विद्यार्थी यांनी देवीस
श्रीसूक्ताचे सामूहिक पाठ व मंत्रोच्चारण केले। येळी येथील ह भ प नामदेव महाराज
बडे यांचे जाहीर हरिकीर्तन झाले.
0 Comments