नयी चेतना,पहल बदल की, लिंग भेदभाव व हिंसा समाप्ती मोहीम !


पाथर्डी - दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM), ग्रामीण विकास मंत्रालय(MoRD) भारत सरकार मार्फत नयी चेतना : पहल बदल की नावाची लिंग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय जेंडर मोहीम सुरु केली असून मोहिमेची थीम लिंग आधारित हिंसा समाप्ती करणे अशी आहे. 

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत समाजातील लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासन संचालनालयद्वारे शहर अभियान व्यवस्थापन कक्ष (DAY-NULM), पाथर्डी नगरपरिषद,पाथर्डी मार्फत नयी चेतना : पहल बदल कीकार्यशाळा दि.०४/०१/२०२३ रोजी सकाळी-११ वा. पाथर्डी नगरपरिषद सभागृह, येथे श्री.संतोष लांडगे, शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यशाळेत महिलासंबंधी शासनाच्या विविध यंत्रणाचे अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी राजेंद्र परदेशी, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक पाथर्डी, स्वाती तिजोरे,समुपदेशक, समुपदेशन केंद्र पाथर्डी, ऍड. प्रज्ञा शिरसाट, सरकारी वकील, श्रीमती पाखरे,पंचायत समिती पाथर्डी, नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी अय्यूब सय्यद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल कोळगे, समुदाय संघटक समीना शेख , सीएमआरसीचे व्यवस्थापक राहुल पाठक, सहयोगीनी स्मिता आगळे, अनिता काटकर यांच्यासह शहरातील शहरस्तर संघ, वस्तीस्तर संघ, बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अध्यक्षीय भाषणात पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.संतोष लांडगे म्हणाले, "नयी चेतना -पहल बदल की" ही केंद्र शासनाची लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्यासाठीची महत्वकांक्षी मोहिम आहे. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहे, दोघांनाही कुटुंबापासून तर बाहेर समाजापर्यंत जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता एकसमान असून लिंगभाव समानता असणे आवश्यक आहे. बोलताना पुढे म्हणाले "शहरातील महिलांना बचत गटांमुळे कर्ज मिळाले त्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्या,महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या" परंतू आता पुढचा टप्पा बचत गटांनी विविध उत्पादन तयार केले तर शाश्वत स्वयंरोजगार निर्माण होईल.त्यातून कुटुंबाची आर्थिक उन्नती होऊन उपजीविकेचं साधने निर्माण होतील.तेव्हाच नागरी दारिद्रय निर्मूलन होऊन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा मुख्य उद्देश पूर्ण होईल.  कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाली. यावेळी शहरातील 18 बचत गटांना महाराष्ट्र बँकेमार्फत 28 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले. तसेच चालुवर्षी आजपर्यंत सर्व बँकांमार्फत 38 बचत गटांना 89 लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते पाथर्डी नगरपरिषद मार्फत बचतगटांना लेखासंच किट वाटप करण्यात आले. त्यानंतर लिंगभाव समानता प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Post a Comment

0 Comments