पाथर्डी - समाजाची घडी,भेदभाव विषमते पासून दूर ठेवून सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याची शिकवण सर्वच संतांनी दिली.दुर्दैवाने आज सर्व समाजाला जातीभेदाच्या चक्रात अडकवून राजकीय पोळी भाजली जात आहे.एकसंघ व धर्मनिष्ठ समाजासाठी संतांचे विचार आचरणात आणावे असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे वंशज तथा चोखोबा तुकोबा समता वारीचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे महाराज यांनी केले.
चोखोबा ते तुकोबा
या वारीला संत चोखामेळा यांच्या कर्मभूमी मंगळवेढा इथून प्रारंभ होऊन येत्या बारा
जानेवारीला वारीचा समारोप देहु येथे होणार आहे.पाथर्डी तालुक्यात वारीचे जोरदार
स्वागत करण्यात आले.दलित वस्ती मधील लक्ष्मी माता मंदिरात देवीची महापूजा होऊन
स्थानिक ग्रामस्थांनी संवाद साधला.यावेळी वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक गोविंद
महाराज जाटदेवळेकर,संघाचे तालुका कार्यवाह अरविंद पारगावकर,अखिल भारतीय
कार्यकारिणी सदस्य प्रा.रमेश पांडव,महाराष्ट्राचे मुख्य संयोजक निलेश
गद्रे,विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे,मोहटा देवस्थानचे
विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख,सुनील महाजन,मोहन महाराज सुडके भारिपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे
आदी उपस्थित होते.
यावेळी विविध
वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.मोरे महाराज म्हणाले पांडुरंगाच्या अस्तित्वाला
केंद्र मानून अठरापगड जातींना एकत्र करणारा महा समन्वयक म्हणजे वारकरी सांप्रदाय
असून त्याचे मूळ बहुजनांच्या आध्यात्मिक हिताच्या मानवीय व्यवहारात गुंतलेले
आहे.समाजात बंधुभाव आणि सामाजिक एकता प्रस्थापित करायची असेल तर वारकरी संप्रदाय
हेच एकमेव अधिष्ठान आहे.एक वारी समतेची हा उपक्रम म्हणजे त्या समन्वयवादी
विचारांची पाऊलवाट आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोरक्ष दिनकर,प्रेम दिनकर,सोमनाथ घोरपडे ,महेश गायकवाड,नाना काकडे,प्रशांत हंपे ,सुरज दिनकर, खंडू दिनकर,मुरली दिनकर यांनी
परिश्रम घेतले.शिरसागर महाराज यांनी आभार मानले.तारकेश्वर गडावर आदिनाथ शास्त्री
महाराज यांनी दिंडीचे स्वागत केले.
0 Comments