बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची मशाल पेटत ठेवली- सौ.मंगलताई म्हस्के

 

करंजी - हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपुर्ण आयुष्य हिंदुत्वाची मशाल पेटत ठेवण्यात व्यतीत केले असल्याचे मत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक व कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगलताई म्हस्के यांनी कौडगाव येथे ग्रामपंचायतच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात हिंदुसाठी जे काम व त्याग केला,ते आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील हिंदु विसरु शकणार नाहीत. त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून हिंदुसाठी परखड मत मांडले, संपादक, पत्रकार, व्यंगचित्रकार, प्रखर वक्ते म्हणुन त्यांनी संपुर्ण आयुष्यभर संघर्ष केला असल्याचेही मंगलताई म्हस्के यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा महिला संघटक तथा सरपंच सौ. मंगलताई राजेंद्र म्हस्के,उपसरपंच अंबादास कारखेले, पारूबाई दोडके, विकास उदमले, गीता कारखेले, सोनाली कारखेले, राणी पवार, विद्या म्हस्के, दोडके पाटील, ग्रामसेवक नजन भाऊसाहेब, बबन आठरे, सतीश आठरे, बाळासाहेब कारखेलेसह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments