छोटीशी दैनिक बचत संकट काळातील मोठा आर्थिक आधार ! - जयश्री दहिफळे

 

पाथर्डी – भरभराटीच्या कालावधीत केलेली छोटीशी बचत ही संकट काळात मोठी मदत बनून कुटुंबाला मोठा आधार होवू शकतो हा मूलमंत्र घेवून श्री स्वामी समर्थ महिला बचत गट महिलांना दैनिक बचतिचे महत्व पटवून देत असल्याचे मत गटाच्या गटाच्या अध्यक्षा सौ.जयश्री संतोष दहिफळे यांनी व्यक्त केले.

मकर सक्रांतीचे औचित्य साधून बचत गटाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू व स्नेहभोजन कार्यक्रम गटाच्या सभासद सविता देशमुख व सुषमा देशमुख यांच्या सहकार्याने करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून वर्षा गर्जे उपस्थित होत्या तसेच त्यांनी गटाच्या कामकाजाविषयी माहित घेवून कार्याचे कौतूक केले.

गटाच्या सचिव सौ. अर्चना राजेंद्र धायतडक यांनी गटाचे यशस्वी संघटन करून गटाच्या व्याज वाटपातून वृक्षा रोपण, अष्टविनायक सहल यासारखे उपक्रम राबविले आहेत.यावेळी वाण म्हणून प्रत्येक सदस्यास जेवणाचा डबा भेट देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाअंतर्गत होत असलेल्या बचतीतून सभासदास व्यवसाय उभारणी कामी व्याजदरावर कर्ज उपलब्ध होऊन सभासदांचा आर्थिक प्रश्न  सुटण्यास हातभार लागत आहे.यावेळी अर्चना धायतडक,पूनम देशमुख,जयश्री एकशिंगे,सुरेखा पालवे,छाया खेडकर,सुरेखा गर्जे,सारिका पालवे,मनीषा पालवे,सुशीला खेडकर,प्रतिभा बडे,मंगल डोळे,सुवर्णा परदेशी,दुशाला दराडे,सुनिता बडे,सपना गायकवाड,पुष्पा परदेशी,साक्षी धायतडक,राधाबाई दराडे ह्या बचत गटाच्या सभासद उपस्तीत होते.भविष्यात महिलांच्या आर्थिक, तसेच आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्याचा गटाचा मानस असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.


Post a Comment

0 Comments