पाथर्डी -वंचित बहुजन आघाडी शाखा सोमठाणे नलवडे ता पाथर्डी जी अहमदनगर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मौजे सोमठाणे नलवडे येथील समस्त स्वाभिमानी ग्रामस्थ व युवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक आयोजित केली होती.
यावेळी वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन ही करण्यात आले या घोंगडी बैठकीस मोठ्या संख्येने सोमठाणे नलवडे येथील ग्रामस्थ व तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढुनी तोफा फटाके वाजवून सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचे जंगी स्वागत करण्यात आले या घोंगडी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोमठाणे गावचे माजी सरपंच अप्पासाहेब नलवडे हे होते,यावेळी कोरडगावचे नवनिर्वाचित युवा सरपंच भोरू म्हस्के, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई पाथर्डी तालुका महासचिव संजय कांबळे व ईतर स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या घोंगडी बैठकी बाबत प्रा किसन चव्हाण यांनी पाथर्डी, शेवगाव तालुक्यात घोंगडी बैठका घेण्यापाठीमागची भूमिका आपल्या आक्रमक भाषणात मांडली.
बैठकीस युवा सामाजिक कार्यकर्ते सदाभाऊ खर्चन,कोरडगाव ग्रामपंचायत सदस्य प्रतापनाना देशमुख, नागनाथ वाकळे, स्वराज बोंद्रे, पाथर्डी शहर अध्यक्ष किशोर फडतुरे, रंगनाथ कुर्हाडे,शेख सलीम जिलाणी, गोरख तुपविहीरे, माऊली बढे, प्रभाकर दौंडे, संतोष काकडे, बाळू मगर, श्रीधर दौंडे, बाळासाहेब बढे, नवनाथ खंडागळे,लोटके शेठ, विष्णू नलवडे,गोरक्ष सुपेकर, आसाराम नलवडे, योसेफ शिंदे, भाऊराव डाके, प्रमोद खर्चन, आसाराम डाके, मनोहर दौंडे, संदिप बळीद, किशोर डाके,भिवसेन शिंदे, लक्ष्मण काकडे, अविनाश खर्चन, मोहन नाना डाके, संकेत दौंडे, जालिंदर काकडे व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या घोंगडी बैठकीचे प्रास्ताविक उपसरपंच आकाश दौंडे यांनी केले तर सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे पाथर्डी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दौंडे यांनी केले.
0 Comments