सर्रासपणे लॉज
व्यवसाय हे नियम धाब्यावर बसून व्यवसाय चालु आहे ही अधिराज्य ने वेळोवेळी उघड
केलेली आहे तसेच हि बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्या नंतर नियमांची पायमल्ली
करणाऱ्या लॉज धारकांना कारवाईचा बडगा पोलिसांनी हाती घेतला आहे. गुरुवारी
सकाळपासून पोलिसांनी शहरातील असणाऱ्या लॉजवरती अचानक धाडी टाकून तपासणी सुरू केली
आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणी हि तपासणी मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवणार असल्याचे
पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले आहे.
शहरात विविध ठिकाणी
लॉजिंगचा व्यवसाय करण्यात येतो काही ठिकाणी अक्षरशः नियम धाब्यावर बसून व्यवसाय
केला जातो या ठिकाणी आक्षेपार्ह असे कृत्य होते त्याकडे आता पोलिसांनी आपली नजर
ठेवायला सुरुवात केली आहे. लॉजवर मुक्कामी येणारे ग्राहक असोत किंवा काही तास
विसावा घेण्यासाठी येणारे ग्राहक असोत; या सर्वांच्या नोंदी ठेवणे आवश्यक
आहे.
लॉजिंगचा व्यवसाय
करताना आलेल्या ग्राहकांकडून संपूर्ण पत्ता त्याचे ओळखपत्राची झेरॉक्स, मोबाईल नंबर त्याचे
येण्याचे कारण आपल्या रजिस्टर मध्ये त्याबाबत सविस्तर नोंद घेणे कायद्याने
बंधनकारक आहे.लॉजिंग मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती प्रवेश करताना प्रथमदर्शनीय
भागात अद्यावत सीसीटीव्ही असणे बंधनकारक आहे मात्र अशा नियमांचे अक्षरशः पायमल्ली
आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी काही लॉज व्यावसायिक करीत आहे. कायद्याने लॉजिंग
मध्ये राहण्यासाठी अठरा वय वर्ष पूर्ण असावे लागते पण काही लॉजिंग व्यवसाय पूर्ण
नसताना त्यांना लॉजिंग वर राहण्यासाठी परवानगी देऊन नियमाचे उल्लंघन करत आहेत.
अवैध धंद्यांचे
केंद्र बनू पाहणाया काही लॉज व्यवसाय करतात अशी बाब पोलीस तपासातही काही
महिन्यांपूर्वी निदर्शनास आले आहे त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.लॉज
चालकांना ग्राहकांच्या नोंदी रजिस्टर मध्ये करून ते जतन करणे महत्त्वाचा आहे.लॉजवर
विसाव्यासाठी येणाऱ्यांची माहिती वेळप्रसंगी पोलिसांना तपासासाठी लागत असते म्हणून
याचे नियमाचे पालन होणे गरजेचे आहे.अनेक आरोपींनी लॉजवरच मुक्काम केल्याच्या घटना
आहेत. शिवाय अनेक लॉजवर अवैध धंदे बिनधास्त सुरू असल्याचेही पोलिसांच्या कारवाईतून
समोर आले आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कारवाईचे पाऊल
उचलत लॉज तपासणी मोहीम सुरू केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील लॉज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय करताना येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांच्या आद्यवाद नोंदी ठेवल्या नसून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा लॉज चालकांना पोलिसांनी कायदेशीर कारवाईच्या नोटीस बजावला आहेत.लॉज व्यावसायिकांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण याचे जतन करणे आवश्यक असून ग्राहकांचे ओळखपत्र झेरॉक्स याचेही दप्तरी नोंद ठेवणे बंधनकारक आहे असे आढळून न आलेल्या लॉज चालकांवर पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.त्यामुळे अवैधरित्या लॉज व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.लॉजिंगचा अवैद्य व्यवसाय करणारे काही लॉज व्यवसायिक या धंद्यावर मोठे झाले आहेत.यामोहीमेत पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, संदिप गर्जे, राजेंद्र सुद्रुक, महिला पोलीस कर्मचारी अश्विनी झिरपे आदी सहभागी झाले होते.
0 Comments