पाथर्डी तहसील आवारात व्यवसायासाठी जागा देण्याची मागणी

 

पाथर्डी – तहसील कार्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवताना माजी सैनिक दत्तू धोंडी शिरसाट यांचे शालेय साहित्य,स्टेशनरी शॉप प्रशासनाने हटवले त्यामुळे त्यांचा रोजगार हिरावला असून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना तहसील कार्यालयाच्या आवारात भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी यासह तालुक्यातील माजी व सेवारत सैनिकाचे तहसील कार्यालयाच्या अधिन असलेले प्रलंबीत प्रश्न तातडीने मार्गी लावण्या बाबत त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देवून विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली.

पाथर्डी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तालुक्यातील सेवानिवृत्त व सेवारत सैनिकांचे येणारे सर्व प्रश्न तहसील अधिकार क्षेत्रात न्याय प्रविष्ठ असलेल्या सर्व अडचणी, विशेष लक्ष देऊन सैनिकांना न्याय मिळवून देण्याबाबत सैनिक संघाच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांच्या कडे मागणी करण्यात आली. माजी सैनिक संभाजी मूरलीधर कोलते (गाव माळी बाभूळगाव) यांचे शेतामधून वहिवाट रस्ता मागणी करण्यात आली आहे याबबत तहसीलदार यांनी यापूर्वी निर्णय दिलेला आहे मात्र उच्च न्यायालयाने पून्हा फेरविचार करून निर्णय देण्याचे सांगितले आहे मात्र याबाबत लवकरात लवकर निर्णय देवून माजी सैनिक यांना न्याय देण्याची मागणी यावेळी तहसीलदार वाडकर यांना करण्यात आली आहे.याशिवाय शिराळ येथील माजी सैनिक बाबासाहेब गेणुजी आव्हाड यांच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन ही त्यांच्या सुनेच्या नावे गेलेली आहे.यासंदर्भात २४ जानेवारी २०२३ रोजी संघटनेच्या वतीने सर्व कागदपत्र सादर केलेली आहेत.

याशिवाय माजी सैनिक सुधाकर आश्रुबा आव्हाड रा.जांभळी यांच्या शेताच्या वहिवाटाचा प्रश्न २५/०१/२०२१ पासून प्रलंबीत आहे. रस्ता नसल्याने त्यांचा उस शेतात उभा आहे.तसेच त्यांची जमीन हक्कसोडपत्र झाल्यानंतर त्यांच्या आत्याच्या नावे चुकीने नोंद लागली आहे ती दुरुस्त करण्याची मागणी यावेळी त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी त्रिदल सैनिक संघाचे गोवर्धन गर्जे, विठ्ठल तांदळे, रामराव चेमटे, अप्पा घनवट, दत्तात्रय बांगर, ईश्वर देशमुख, सी आय पठाण, आझाद पठाण, विश्वास गर्जे, बाबासाहेब गर्जे, नितीन देशमुख, अनिल काळे, मधुकर पाखरे, मधुकर चनने, बाबासाहेब मिसाळ, विजय आव्हाड, श्रीकृष्ण दौंड, दिनकर खेडकर, भगवान बटूळे,महादेव आंधळे, हरिभाऊ फुंदे, म्हातारदेव आव्हाड, सुधाकर आव्हाड, भीमराज पाटेकर, सादिक शेख, संतोष शिदोरे, चांगदेव आठरे, गायकवाड, शिकारे, अर्जुन शिरसाठ, अशोक शिरसाठ, रोहिदास एडके, शिवनाथ ढोले, लक्ष्मन डमाळे, जालिंदर गोरे, दिनकर वेताळ, अण्णा घुले, सय्यद राहिमान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तहसीलदार शाम वाडकर यांनी लवकरच चारही प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्रिदल सैनिक संघाच्या सदस्यांना दिले आहे.


Post a Comment

0 Comments