शेवगावात २० हजारांची लाच मागणी प्रकरणी पोलीस सापळ्यात

शेवगाव – अपघाताचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी व वाहन चालकाचा शोध घेऊन त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे मोबदल्यात स्वतः करिता तक्रारदार यांच्याकडून १३ जानेवारी रोजी २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून लाच मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपी पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे शेवगाव पोलीस स्टेशन याचे विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात लाच मागणी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यवाहीत सापळा अधिकारी साधना इंगळे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, सापळा पथक पो.हवा. सचिन गोसावी , पो. हवा. प्रफुल्ल माळी, पो. हवा. चंद्रशेखर मोरे, पो. ना. मनोज पाटील, चा. पो. हवा. विनोद पवार आदी सहभागी झाले होते.  

Post a Comment

0 Comments