पाथर्डी – कोरोना कालावधीत सोशल मेडियाच्या अनियंत्रित वापरामुळे युवक युवती पळून जावून लग्न करण्याचे प्रमाण वाढले असून लव्ह जिहाद सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अश्या घटना घडल्या नंतर ऐनवेळी कार्यकर्ते पोलीस मदतीसाठी धावाधाव करतात तसेच कुठल्याही धर्मातून इतर धर्मात धर्मांतर सामाजिक सलोखा बिघडवते याबाबत पत्रकारांनी लेखणी व व्याखानातून आवाज उठवावा असे मत खासदार सुजय विखे यांनी पत्रकार दिना निमित्त पाथर्डी येथे आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमात व्यक्त केले.
यापूर्वी आव्हाड कोलेजवर भाऊराव शिरसाठ यांच्या जन्मदिनी आयोजित कार्यक्रमात आपण उपोषणात आज बाजूच्या सहा सात आंदोलकांनी जेवण केल्याचे बोललो मात्र पत्रकारांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला, आधीच राजकारणाची पातळी घसरलेली असून पुढार्यांनी तोंडातून उच्चारलेले वाक्यच पत्रकारांनी लिहले पाहिजेत,पत्रकारांनी सोयीचा अर्थ काढून बातम्या लिहल्याने राजकीय चारित्र्य हनन व नुकसान होते. लव जिहाद व धर्मांतरासारखे विषय सामाजिक व धार्मिक आरोग्यासाठी हानिकारक असून माध्यमांनी अशा समाजविघातक अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवावा धार्मिक व जातीय सलोखा कोणत्याही कारणाने बिघडू नये यासाठी सामाजिक व्यासपीठ अधिक सशक्त केले जावेत अशी अपेक्षा खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केली. बाबूजी आव्हाड महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे अर्जुन शिरसाट माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड संजय बडे राहुल कारकेले संभाजी वाघ आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकारांतर्फे अविनाश मंत्री व राजेंद्र सावंत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बोलताना डॉ.विखे म्हणाले नगर जिल्ह्यातील पत्रकारांचे जिल्ह्याच्या विकास कामात मोठे योगदान असून पूर्वीच्या काळी सामाजिक व राष्ट्रीय चळवळी चळवळीमध्ये पत्रकारांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. काळानुसार माध्यमे व माध्यमांची भाषा बदलली असली तरी मूळ लोक जागृतीचा पाया मात्र अधिक मजबूत झाला आहे समाजातील संघटित असंघटित घटकांवर अंकुश ठेवून चांगल्या प्रवृत्तींना पाठबळ देण्याने भारतीय माध्यमे अधिक प्रभावी ठरत आहेत विखे कुटुंबाला सुद्धा जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठी ताकद देत लोक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व विकास कामांसाठी सर्वाधिक सहकार्य केले आहे चारित्र्य आनंद अथवा अतिरंगी वृत्त देणे ऐवजी सध्या समाजापुढे भेडसावत असलेल्या लव जिहाद धर्मांतर आई-वडिलांच्या संमतीशिवाय होणारे विवाह मुलींची समाजविघातक प्रवृत्तींकडून होणारी फसवणूक अशा गंभीर विषयांवर माध्यमांकडून जागृती आवश्यक आहे अशा प्रकारचे शोषण व फसवणूक झालेल्या कुटुंबाची संख्या वाढत असून याचा उद्रेक होण्या ऐवजी पायबंध घालण्यासाठी समाजाचा सुद्धा दबाव वाढायला हवा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून अभय आव्हाड यांनी आभार मानले.
0 Comments