भगवान नगरातील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरीक आक्रमक

 

पाथर्डी – शहरातील भगवान नगरहद्दीतील रस्त्यावर सरकारी जागेत खाजगी व्यक्तींनी लोखंडी कुंपण उभारून अतिक्रमण करून रस्ता अरुंद केला असून सदरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याची मागणी करत पालिका प्रशासना विरुद्ध आंदोलनाचा इशारा नागरिक भगवान मल्हारी बांगर यांच्या सह नागरिकांनी दिला आहे.  

नागरिक भगवान बांगर,रामनाथ फुंदे,शामराव बडे,डॉ विठ्ठल दहिफळे,अशोक व्यवहारे यांनी पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,भगवाननगर, फुलेनगर रस्त्यावरील जगन्नाथ उत्तम सानप, सौ. लता जगन्नाथ सानप व मुलगा आनंद जगन्नाथ सानप यांनी सरकारी जागेवर बांधकाम करुन अधिकृत रस्त्यावर अनाधिकाराने कॉक्रीटचा रस्ता तोडून लोखंडी अँगलच्या सहाय्याने कंपाऊंट व गेट बसवून अतिक्रमण केले आहे.सदरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. वाहतुकीच्या अडथळ्यामुळे वाहनामध्ये अपघात होऊन मनुष्य जीवितास हानी होण्याची शक्यता आहे.यामुळे सरकारी जागेवरील व रस्त्यावरील अतिक्रमण पालिका प्रशासनाने हटवावे अन्यथा पालिका प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.

पाथर्डी शहरात सार्वजनिक वाहतुकीचे रस्ते व मोकळ्या जागा अतिक्रमण करून ताब्यात घेतल्याने नागरिक त्रस्त असून याविरुद्ध लवकरच मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  


Post a Comment

0 Comments