करंजी - येथील स्टार क्रिकेट क्लबने आयपीएल च्या धर्तीवर आयोजित केलेल्या केपीएल क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामन्यात करंजी सुपर किंग्ज संघाने करंजी इंडीयन संघाला हरवुन अजिंक्यपद मिळविले.तर करंजी इंडियन्स संघाला दुसरे बक्षीस मिळाले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे आयपीएल सामन्यांच्या धर्तीवर केपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत फक्त आठ संघांना प्रवेश दिला होता. आज २६ जानेवारीनिमित्त या स्पर्धेतील अंतिम सामना करंजी इंडियन्स व करंजी सुपर किंग्ज या दोन संघात खेळला गेला. करंजी सुपर किंग्ज संघाच्या कर्णधार विवेक मोरे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवित करंजी सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजाने करंजी इंडियन्स संघाला १० षटकात अवघ्या ४९ धावात रोखले.
१० षटकात ५० धावा करण्याचे आवाहन अतिशय नियोजनबद्ध खेळ करीत अवघे दोन गडी गमावुन पुर्ण केले. सलामीचा फलंदाज मच्छिंद्र दानवे याने अतिशय संयमी नाबाद खेळी करुन संघाला विजयी केले. करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, शिवसेनेचे रफिकभैय्या शेख, आदर्श शिक्षक विजय अकोलकर, जालिंदर वामनसह अनेक मान्यवरांच्या हस्ते चषक उंचावताना करंजी सुपर किंग्जच्या खेळाडुंनी एकच जल्लोष केला.
येथील ग्रामपंचायत सदस्य रोहित अकोलकर, प्रा. प्रशांत टाकरेसर, उपसरपंच नवनाथ आरोळेसह स्टार क्रिकेट क्लबच्या सर्वच खेळाडुंनी या स्पर्धेचे सुंदर नियोजन करुन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. आजच्या अंतिम सामन्यासाठी करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, शिवसेनेचे रफिक भैय्या शेख, आदर्श शिक्षक विजय अकोलकर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जालिंदर वामन, सुरेश वाघसह अनेक मान्यवर हजर होते.
0 Comments