पाथर्डीच्या भूमिपुत्राचा अविष्कार,शोधला बहुआयामी अनोखा रणगाडा !


नवी दिल्ली - पाथर्डीचे भूमिपुत्र शास्त्रज्ञ रोहित रावसाहेब मोरे हे भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (D.R.D.O) येथे सिनियर शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत असून त्यांनी व त्यांच्या टीमने संशोधनातून आधुनिक असा हायब्रीड तंत्रज्ञानावर आधारित रणगाडा बनविण्यात यश मिळविले आहे.सदर रणगाड्याचे २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणानिमित्त होणाऱ्या दिल्ली येथील पथसंचलन कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला होता.

सदर हायब्रीड रणगाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जमीन तसेच पाण्यावरूनही चालू शकतो.तसेच तो डोंगराळ प्रदेश, बर्फाळ व वाळवंटी प्रदेशातही उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. खडकाळ जमीन , बर्फ, वाळवंटातील वाळू ते अगदी पाण्यावरही लीलया चालणारा हा रणगाडा म्हणजे भारतीय सैन्याला दहा हत्तीचे बळ देणारे अस्रच जणू. खास करून चीन शी निगडित सीमा भागात याचा जास्त उपयोग होणार आहे.यासगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या संचालनात,रोहितला या संशोधित रणगाड्या सोबत उभा रहाण्याचा मान त्याला मिळाला आहे.अशा प्रकारचा भारतीय स्वदेशी बनावटीचा हा पहिलाच हायब्रीड रणगाडा आहे.त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल शास्त्रज्ञ रोहित रावसाहेब मोरे यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रोहित मोरे यांचे माध्यमिक शिक्षण पाथर्डी येथील श्री तीलोक जैन विद्यालयात झाले असून प्राध्यापक रावसाहेब मोरे यांचे रोहित मोरे हे धाकटे चिरंजीव आहेत. 

रोहित मोरे यांनी ग्रामीण भागातील परिस्थितीवर मात करत त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधुन पदवी प्राप्त केली (बी.ई.) व त्यानंतर गेट (G.A.T.E) या आखिल भारतीय पातळीवरील प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवून आय.आय.टी.(I.I.T) या संस्थेमधुन एम.टेक(.M.Tech. in Aerospace engineering) पुर्ण केले व त्यानंतर ते D. R. D. O.(Defence Research and Development Organisation) या केंद्र शासनाच्या विभागात शास्त्रज्ञ या पदावर नियुक्त झाले. भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांचेही मार्गदर्शन त्यांना एम.टेकचे शिक्षण करत असतांना लाभलेले आहे.व आज ते सदर विभागामध्ये बढती मिळून सिनीअर सायंटिस्ट पदावर कार्यरत आहेत.

शास्त्रज्ञ रोहित रावसाहेब मोरे यांच्या या संशोधना बाबत पाथर्डी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून रोहित मोरे यांनी यापुढील कालावधीत देशसेवेसाठी अश्या प्रकारचे अनेक संशोधन करण्याचा मानस असल्याचे सांगितले.  


 

 

 

 

Post a Comment

0 Comments