लोहसर ग्रामपंचायतला वनश्री पुरस्कार मिळणार


अहमदनगर - महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गाव व वनक्षेत्रातील वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन भरीव कामगिरीबद्दल मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मध्ये जाहीर झाला आहे.

राज्यस्तरावर लोहसर ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाला असून व नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये २९ हजार ग्रामपंचायती असून त्यात लोहसर ग्रामपंचायतचा तृतीय क्रमांक आहे.तृतीय क्रमांकाचे ५००००/- रुपये बक्षीस आणि नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे ५००००/- हजार बक्षीस लोहसर ग्रामपंचायतला मिळणार आहे. उद्या २६ जानेवारीला हा पुरस्कार नाशिक येथील पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री यांच्या हस्ते समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोहसर ग्रामपंचायत ही अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम वनश्री ग्रामपंचायत बहुमान मिळवणारी ग्रामपंचायत ठरणार आहे गतकाळात केलेली वनक्षेत्रात चराई बंदी कुऱ्हाड बंदी ,, गावाकडे येणारे रस्त्यांच्या दूतर्फा बिहार प्याटर्न योजना वृक्ष लागवड, गावात राबवलेली अभिनव स्मृती वृक्ष योजना यामुळे हा पुरस्कार लोहसर ग्रामपंचायतला मिळाला आहे. तत्कालीन नाशिक विभागीय वन आयुक्त रामाराव यांनी लोहसरला भेट देऊन कौतुक केले होते तत्कालीन जिल्हा वन अधिकारी श्रीलक्ष्मी मॅडम व तिसगाव परिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी खूप वेळा लोहसरला येऊन मार्गदर्शन केले होते या पुरस्कारात तत्कालीन तिसगाव वन कार्यालयातील अधिकारी यांचा शिंहाचा वाटा आहे हा पुरस्कार स्वीकारण्याची माजी सरपंच व विद्यमान ग्राप सदशय अनिल गिते पाटील हे नाशिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात हा पुरस्कार ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच मिळत आहे तत्कालीन जिल्हा उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी मॅडम व तिसगाव वन परिक्षेत्र अधिकारी धनविजय यांना ही बातमी समजल्यावर त्यांनी सरपंच हिरा गिते व माजी सरपंच अनिल गिते यांचे कौतुक व अभिनंदन केले परंतु दुर्दैवाने सध्याचे अहमदनगर उपवनसंरक्षक अधिकारी आणि तीसगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांनी हा पुरस्कार जिल्ह्याला मिळवून देणाऱ्या लोहसरला भेट दिली नाही व साधे फोनवर अभिनंदन सुद्धा केले नाही मागील काही दिवसांपासून या विभागाच्या दुर्लक्षा मुळे झालेले वनक्षेत्रातील वृक्ष तोड, वन्यजीवांची वाढती शिकार, या मुळे मातीमोल होत आहे त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारावा की नाकारावा या द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत असे अनिल गिते पाटील अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापण समिती यांनी सांगितले.

 

 

Post a Comment

0 Comments