पितृ प्रेमापोटी मुलाकडून आई व पत्नीला पिस्तूलने मारहाण !

पाथर्डी – कौटुंबिक कलहाचे रुपांतरण हाणामारीत होवून पिता पुत्र दोघांनी आपल्या बायकांना लोखंडी पाईप व पिस्तुलच्या मुठीने मारहाण केल्याची विचित्र घटना पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथे घडली असून याबाबत महिलेच्या फिर्यादी वरून पती व मुला विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 


चारित्यावर संशय घेवून पतीने पत्नीला लोखंडी पाईपने व लायसन्सच्या पिस्तुलानने मारहाण केली.यावेळी भांडणे सोडवण्यास सून मध्ये आली तेंव्हा पिडित महिलेचा मुलगा हा तेथे आला व त्याने तू कशाला मध्ये पडली असे म्हणून त्याने त्याच्या पत्नीलाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनतर मुलगा म्हणाला की, माझ्या वडीलांच्या नादी लागल्या तर तुम्हा दोघींना गोळी घालून जिवे मारून टाकीन अशी धमकी आई आणि पत्नीला मुलांनी दिली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून पती व मुलगा या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.२३ जानेवारी रोजी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नी व सुन यांना शिवीगाळ करून पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केली.तेंव्हा महिलेची सुन सोडवण्यास मध्ये आली व भांडण सोडले त्यांनतर पतीने घरामध्ये जावून त्यांच्याकडील लायसन्सचा पिस्तूल घेवून पत्नीला पिस्तूलच्या मुठीने पाठीत मारहान केली. तेंव्हा पिडीत महिलेचा मुलगा हा तेथे आला व पत्नीला म्हणाला की, तू कशाला मध्ये पडली असे म्हणून त्याच्या ही पत्नीला मारहाण केली. तेंव्हा पिडीत महिला सुनेला सोडवले असता मुलाने घरामध्ये जावून त्याच्याकडील लोखंडी गावठी कट्टा (पिस्तूल) घेवून आला व आई आणि पत्नीला दाखवून म्हणाला की, तुम्ही जर परत माझ्या वडीलांच्या नादी लागल्या तर तुम्हा दोघींना गोळी घालून जिवे मारून टाकीन अशी दोघांनी धमकी दिली आहे.घाबरलेल्या सासु सुनेने एक दिवस घरीच थांबून घरातील गावठी कट्टा पोलिसांकडे मंगळवारी ताब्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे. 


Post a Comment

0 Comments