तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी महेश भागवत


पाथर्डी – तालुक्याचे सुपुत्र वरिष्ठ आय.पी.एस.अधिकारी महेश भागवत यांची तेलंगण राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक नियुक्ती झाली असून या वरिष्ठ पदावरील नियुक्ती मुळे भागवत यांचे तेलंगाना सह महाराष्ट्र राज्यभरातून सध्या मोठे कौतुक होत आहे.

भागवत हे आय पी एस अधिकारी झाल्या नंतर देशातील अनेक राज्यात काम करताना त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केल्या नंतर २०१४ साली तेलंगण राज्याची निर्मिती झाल्या नंतर ते तेलंगण राज्याचे पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम केले तर त्या नंतर सण २०१६ पासून ते राचकोंडा पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची तेलंगणा राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून येत्या ९ जाने. ला ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तेलंगण राज्यात असलेल्या आपल्या सेवेच्या काळात भागवत यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केल्याने त्यांना २०१६ साली देशाचे गृहमंत्री रामनाथ सिंह यांच्या हस्ते प्रशंसा पदक मिळाले होते तर २०१७ साली अमेरिकन सरकारच्या वतीने दिला जाणारा ट्राफिक इन रिपोर्ट हिरो हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. संपूर्ण जगातून हा पुरस्कार केवळ आठ अधिकाऱ्यांना दिला जातो. तेलंगणा राज्यात त्यांनी वीट भट्टी मजुरांसाठी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शाळा सुरु केल्या होत्या. या कार्याची दखल अमेरिकन पोलीस प्रमुख संघटनांनी घेत भागवत यांना पुरस्कार दिला होता तर १५ ऑगस्ट २०२२ साली भागवत यांनी राष्ट्र्पतीच्या विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments