पाथर्डी - शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने श्री
स्वामी समर्थ विद्यामंदिर, पाथर्डी' विद्यालयात 'फूड फेस्टिवल' बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या फूड फेस्टिवल
कार्यक्रमात शहरातील पालकांनी प्रचंड प्रतिसाद देत मुलांकडून विविध फळे, भाजीपाला तथा
खाद्यपदार्थाची खरेदी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी
वेगवेगळे पदार्थ अर्थातच फळे,
भाजीपाला तसेच खाद्य पदार्थ विकण्यास
आणले होता या पदार्थाचे महत्त्व आणि मूल्य सांगत मुलांनी पालकांनाही पदार्थ खरेदी
करण्यास भाग पाडत विद्यार्थ्यानी व्यवहारचातुर्याच्या जोरावर उपस्थीत मान्यवरांची
व पालकांची मने जिंकून घेतली. बाजारातील देवघेव, हिशोब करणे, वस्तूंची किंमत
ठरविणे, वस्तू बद्दल माहिती पटवून सांगणे याबाबत लहान वयातच मुलांना माहिती
व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम अतिशय सुंदर स्तुत्य असून मुलांच्या जडणघडणीत
अशा उपक्रमाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे या कार्यक्रमाचे उद्घाटक मोहटादेवी
देवस्थान विश्वस्त डॉ श्रीधर देशमुख यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.
0 Comments