पाथर्डी
- तालुक्यातील
घाटशिरस येथे बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या महिलेला अडवून तिच्या ताब्यातील २९ बकऱ्या व अंगावरील ७
ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना घडली असून याबाबत
पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
घाटशिरस येथील अरुणा दिलीप गर्जे वय ५५ ह्या गेली अनेक वर्षापासून घाटशिरस गावाच्या परिसरातील डोंगराळ भागात शेळ्या चारून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अरुणा गर्जे यांच्याकडे एकूण ४७ लहान मोठ्या शेळ्या होत्या मात्र काल दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी अरुणा गर्जे ह्या गावाच्या जवळच्या डोंगराळ भागात शेळ्या चारून सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याने घरी परतत असताना त्यांच्यावर दोन मोटरसायकल वरील चार अज्ञात इसमांनी पाळत ठेवल्याची त्यांच्या लक्षात आले परंतु त्या थोडे पुढे गेल्या नंतर पांढऱ्या रंगाच्या पिकअप मध्ये आणखी काही अज्ञात चोरट्यांनी येऊन अरुणा गर्जे यांना पकडून त्यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याच डोरले व कानातील कुडके असे ७ ग्रम वजनाचे दागिने व २९ लहान मोठ्या शेळ्या त्यामध्ये बकऱ्या व बोकडे असा जवळपास ३ लाखांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे.
याबाबत
फिर्यादी अरुणा गर्जे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली असता
ग्रामस्थांनी आजबाजूच्या काही गावांमध्ये चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली
नाही. याबाबत रात्री उशिरा पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन घडले प्रकाराबाबत गर्जे
फिर्याद दाखल केली मात्र सदरील फिर्यादीमध्ये फक्त २९ बकऱ्या बळजबरीने चोरून नेहल्या बाबत म्हटलेले असून दागिने चोरी
बाबत काहीही उल्लेख नाही.याबाबत फिर्यादी महिला हिच्याशी संपर्क केला असता
पोलिसांनी माझी फिर्याद व्यवस्थित घेतली नाही.मी घडले प्रकाराबाबत पोलीस
अधीक्षकांना आज भेटून सविस्तर वृत्तांत सांगणार आहे असे फिर्यादीने सांगितले.
पाथर्डी तालुक्यात
चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दाखल गुन्ह्यांचा शोध लागत नाही त्यामुळे नागरिक
भयभीत झाली आहेत परंतु चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा शेतकऱ्यांच्या पशुधनाकडे
वळवल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर भयभीत झाला आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत
तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
0 Comments