करंजी - अहमदनगर
येथे नुकत्याच झालेल्या सीबीएसई साऊथ झोन स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कुलच्या अंकुर
किरण आठरे याने सिल्व्हर मेडल पटकाविले. अंकुर आठरे हा पाथर्डी तालुक्यातील कौडगाव
आठरे येथील खेळाडू आहे.
या स्पर्धेत
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ राज्यातील स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील
विजयामुळे अंकुरची पाचगणी येथे होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी
निवड झाली. अंकुर आठरे याला प्रशिक्षक अभिजित थेटे, शाळेच्या क्रिडा शिक्षका गवताला पांडे
यांचे मार्गदर्शन लाभले. अंकुरचे वडील नाशिक येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत तर आई
शिक्षिका आहे. अंकुरच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक सिध्दार्थ राजघरिया, डाॅ.पुष्पी दत्त, तसेच अंकुरचे आजोबा
अशोक छत्रपती आठरे, पृथ्वीराज आठरे,संतोष आठरे, आई रुपाली आठरे,
किरण अशोक आठरेसह परिसरातील अनेक
मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments