पाथर्डी - परिस्थिती ही माणसाच्या हातात नसली तरीही परिस्थितीला बदलता येणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्याचे नियोजन केल्यास यश हमखास मिळतेच असे मत प्राचार्य डॉ. दादा मरकड यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील बहि:शाल शिक्षण मंडळाच्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल शिक्षण मंडळाच्या अंतर्गत या व्याख्यानमालेत यशाची गुरुकिल्ली या विषयावर ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी यश मिळण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, काळानुरूप स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये बदल आणि स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक कलाकडे लक्ष द्यावे असे देखील याप्रसंगी त्यांनी विद्यार्थांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. भगवान सांगळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजयकुमार पालवे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अभिमन्यू ढोरमारे यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ. बबन चौरे, प्रा.डॉ. अरुण राख, प्रा. ब्रह्मानंद दराडे, प्रा. डॉ. वैशाली आहेर व प्रा. डॉ. अशोक डोळस आदी उपस्थित होते.
0 Comments