मंदिरातील चोरीवर खबरदारी हाच उपाय – पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण

पाथर्डी – तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी तसेच मंदिर परिसरातून चोरट्या कडून दानपेट्या सह मौल्यवान वस्तूंची चोरी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर व्यवस्थापन प्रतिनिधी यांची पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करून सुरक्षा नियमा बाबत काळजी घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिल्या.

तालुक्यात मंदिर परिसरातून मोठ्या प्रमाणावर चोरांची सत्र सुरू आहे त्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली असून चोऱ्यांचे सत्र थांबवण्यासाठी पोलिसांपुढे कडवे आव्हान बनले आहे. घर, दुकाने व इतर चोऱ्या बरोबर चोरट्यांनी आता मंदिरातही चोरी करण्यासाठीआपला मोर्चा वळवत लक्ष करून दान पेट्या मंदिरातील मौल्यवान ऐवज चोरून घेऊन जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंदिरातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्याकरता मंदिर प्रशासन व तेथील पुजाऱ्यांनी मंदिराच्या सुरक्षा बाबत खबरदारी घेऊन होणाऱ्या चोऱ्या कशा टाळता येईल या प्रमुख उद्देशाने पोलिसांनी ही बैठक घेऊन चोरटे कशा पद्धतीने मंदिरात चोरी करतात याची संपूर्ण माहिती पोलिसांनी देऊन यासाठी कसा आपण मंदिर चोरीला आळा घालू शकतो यावर पोलिसांनी बैठकीसाठी आलेल्या मंदिर प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. अनेक मंदिरा मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने असणारे सीसीटीव्ही संच नाहीत ते सीसीटीव्ही बसवावेत, मंदिरातील दानपेटी मध्ये असलेली रक्कम वेळोवेळी ती काढून दानपेटीत रक्कम जास्त नसेल याची खबरदारी घ्यावी, मुख्य प्रवेशद्वारे लोखंडी असावे त्यासाठी दर्जेदार अशी कुलूप लावून अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आहे. अनेक मंदिरात लोखंडी गेट असतात मात्र त्याचे कुलप दर्जेदार नसल्याने चोरटे सहजपणे ते कुलूप तोडतात त्यामुळे उत्तम दर्जाची लोकसंच असणार अत्यंत महत्त्वाचा असलेला पोलीस दलाने यावेळी सांगितले. रात्रीच्या वेळी खाजगी सुरक्षारक्षकाची नेमणूक मंदिरामध्ये करण्याच्याही महत्त्वाच्या सूचना पोलीस दलाकडून देण्यात आले आहे. बैठकीनंतर गुप्तवार्ताचे भगवान सानप यांनी आलेल्या प्रतिनिधींचे आभार मानले.

 


 


Post a Comment

0 Comments