पाथर्डी - तालुका माहेश्वरी महासभेच्या अध्यक्षपदी सचिन
बजाज तर सचिव पदी रामनाथ बंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेश्वरी राम मंदिरात आयोजित बैठकीसाठी जिल्हा
सभेचे प्रतिनिधी विजय दरक व सत्यनारायण मुंदडा निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व सचिवा सह ११ जणांची कार्यकारिणीवर
बिन विरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील
प्रमाणे अध्यक्ष सचिन रमेशलालजी बजाज, उपाध्यक्ष
संदिप रामनारायण मंत्री, सचिव रामनाथ द्वारकादासजी बंग, कोषाध्यक्ष अशोक
लक्ष्मीनारायण मंत्री,संघटन मंत्री संदिप दगडुरामजी बाहेती, संयुक्त मंत्री जगदीश
कमलकिशोर जी डागा, जिल्हा प्रतिनिधी गणेश सिताराम जी बाहेती, जिल्हा प्रतिनिधी रमाकांत
शिवकरणजी लाहोटी, जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत श्रीकिसन जाजू, सदस्य अविनाश
बाळकृष्णजी मंत्री,सदस्य पुरषोत्तम मदनलाल जी हारकुट यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर सर्व निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.निवडी नंतर पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना निरीक्षक विजय दरक म्हणाले माहेश्वरी समाज बांधवांनी व्यस्त वेळेतून समाजकार्यासाठी वेळ द्यावा.समाज संघटनेच्या माध्यमातून समाज बांधवांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व शिक्षण रोजगाराच्या वाटांबरोबरच संस्कार व संस्कृतीचे महत्त्व पटवले जाते.आगामी काळात छोट्या समाजांनी संघटित व सकारात्मक राहूनच सर्व समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पाथर्डी तालुक्यातील माहेश्वरी समाजाचे कार्य आदर्शवत असून प्रेरणादायी आहे.स्थानिक पातळीवर उद्योगाची कास धरून सर्वांगीण प्रगती समाजाने साधावी असे दरक म्हणाले.नव नियुक्त अध्यक्ष सचिन बजाज यांनी आभार मानले.
या वेळी शहरातील वकील
राजेंद्रजी मंत्री, रमणशेठ लाहोटी, मुन्नाशेठ जाजू, सत्यनारायणजी लोहिया,रामेश्वरजी लोहिया, संदिपशेठ
बाहेती, अशोक मंत्री, जगदीश
डागा,राजेंद्र डागा,संदिप
मंत्री, गणेश गट्टाणी, गणेश
बाहेती, मुकुंद लोहिया,पुरुषोत्तम
हारकूट, सुनील लाहोटी, सतिष
राठी अनिल मंत्री, योगेश कलंत्री या सह इतर समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments