बाराबाभळी जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

 

अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील बाराबाभळी परिसरात पेट्रोल पंपा नजीक रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात आयशर टेम्पो व टाटा छोटा टेम्पो यांच्या दरम्यान समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

बाराबाभळी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्गावर खड्डे चुकवण्याच्या नादात आयशर टेम्पो व छोटा हत्ती टेम्पो यांच्या दरम्यान समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात आयशर टेम्पो मधील दोघे व छोट्या टेम्पो मधील एक गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथे उपचार करता तातडीने हलवले आहे. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन बघ यांची गर्दी झाली होती. दोन्ही वाहनाचा समोरासमोरील जोराचा आघात झाल्याने आयशरमधील एक प्रवासी लोखंडी पत्रात अडकल्याने तो मदतीची याचना करत होता मात्र साधनसामग्रीच्या अभावामुळे त्यास मदत करता येत नव्हती.

राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट व रखडलेले काम तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे हे दैनंदिन अपघाताला कारणीभूत होत असून याबाबत अनेक आंदोलने होऊन देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग व या कामाबाबत उदासीनता असलेले लोकप्रतिनिधी अजूनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशातून संताप व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments