पाथर्डी - शहरातील
शिक्षक कॉलनी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या उच्च विद्युत वाहक
खांबाला वाहनाची धडक लागून खांब महामार्गावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून
परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग वरील उच्च विद्युत वाहक खांबाला वाहनाचा धक्का लागून अपघात झाला या अपघातामुळे शॉर्टसर्किट होऊन विजेच्या तारा तुटल्या व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला तसेच सदरील खांब महामार्गावर आडवा पडल्याने वाहतूक खंडीत झाली असून अपघात झाल्यानंतर वाहतूक आनंद नगर परिसरातून शेवगाव रोड पर्यंत वळवण्यात आली असून उशिराने घटना ठिकाणी पोलिस व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोहोचले असून दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे मात्र परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र बहुतेक अंधारात काढावी लागणार आहे.
0 Comments