मिरी - गमतीदार उखाणे, गाणे, विनोद, गप्पा मारत येथील छत्रपती शिवाजी महाराज
विद्यालयातील नवदुर्गा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महिलांच्या हळदी-कुंकवाच्या
कार्यक्रमाचा शेवट मिष्टान्न भोजनाने झाला तर हा कार्यक्रम या परिसरातील महिलांसाठी एक पर्वणीच
ठरली.
पाथर्डी तालुक्यातील मिरी हे मोठे धार्मिक, परंपरा जपणारे गाव, येथील नवदुर्गा प्रतिष्ठानने परिसरातील महिलांसाठी
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.मिरीच्या सरपंच सौ. सुनंदा राहुल गवळी
यांनी मिरीसह परिसरातील ४०० ते ५०० महिलांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले
होते. या कार्यक्रमात त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांनी आता आपली
संस्कृती जोपासण्यासाठी आपले हिंदु समाजातील सण पारंपारिक पध्दतीने एकत्रीत येवुन
साजरे करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. मिरी येथील छत्रपती शिवाजी
महाराज विद्यालयात आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
महिलांनी हजेरी लावली होती. गमतीदार उखाणे, गाणे,विनोद गप्पांनी हा
कार्यक्रम चांगलाच रंगला होता. शेवटी मिष्टान्न भोजनाने या कार्यक्रमाची सांगता
झाली. परिसरातील महिलांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणीच ठरला.
या कार्यक्रमास सरपंच सुनंदा गवळी, अनुराधा झाडे, जयश्री नरवडे, अंजली गवळी, सुनिता गडाख, संगीता शेळके, गौरी मोटे, प्रियांका सुरासे, शुभांगी गवळी, अलका गवळी, मीना निमसे, दिपाली नन्नवरे, रुपाली काळे, सोनिया मुनोत, प्रिया मेहेर, किर्ती मुनोत, मयुरी गुगळे, तुपे मॅडम, तारामती पवार, सुनिता वेताळ, गीता वेताळ, कमल वेताळसह परिसरातील अनेक मान्यवर
महिलांनी हजेरी लावली होती.
0 Comments