पाथर्डी - जिल्ह्यातील रखडलेल्या तीनही राष्ट्रीय महामार्गासाठी
केलेल्या उपोषण आंदोलन दरम्यान जेवणावेळी झडल्या या आरोपाचे खंडन करत आपले उपोषण केवळ स्टंट
बाजीचा प्रकार होता असे कोणी सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन आपण
राजकारणातून सन्यास घेऊ अशी माहिती आमदार लंके यांनी दिली.
गेल्या सात वर्षापासून
रखडलेल्या निर्मळ नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी
केलेल्या उपोषणा नंतर सुरु झालेल्या कामाची व महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून विविध
कार्यकर्त्याकडे भेटीचा दौरा आ.निलेश लंके यांनी कार्यकर्त्यासह बुधवारी आयोजित केला होता. या दौऱ्या दरम्यान
त्यांनी संपावरील वीज मंडळ कर्मचाऱ्यांची भेट घेवून वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांना पाठींबा दिला. पाथर्डी पालिका हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी उपोषणास बसलेल्या बोरुडे वस्तीवरील सोमनाथ बोरुडे व राजेंद्र बोरुडे या उपोषणार्थींची भेट लंके यांनी घेतली. त्यानंतर आंदोलन ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ.लंके म्हणाले की समाज हिताच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाला कोणी स्टंटबाजी म्हणून टीका करत असेल तर त्यावर आपल्याला काही भाष्य करायचे नाही. कोणाकडे उपोषणा दरम्यान जेवणावळ
केल्याच्या व्हीडीओ क्लिप असतील तर त्या लाईव्ह कराव्यात, राष्ट्रीय महामार्गावरील
अपघातात ४६७ प्रवाश्यांचा जीव गेला हा स्टंट होवू शकतो का ? आम्ही रस्त्याच्या
कडेला जेवणावळी करून स्टंट करत नाही राजकारण करायला माझ्याकडे पगारी कार्यकर्ते नाहीत. मी सर्वसामान्यांना
बरोबर घेऊन लोक प्रश्नांचा आवाज उठवण्यामुळे त्रस्त जनता आपोआपच एकत्रित जमते. व्यथा मांडून
सोडवणूक करण्याची मागणी करुन आपण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. याचेही काही
मोठ्या नेत्यांना वाईट वाटत असेल तर काही इलाज नाही. जिल्ह्यातील राष्ट्रीय
महामार्गाच्या कामावर आपण लक्ष ठेऊन आहोत व शेवट पर्यंत
पाठपुरावा करत राहू.आमच्या आंदोलनानंतर
कामे सुरू झाली आहेत त्यावर आमचे लक्ष आहे.
यावेळी बोरुडे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्या
साठी उपोषण करते
सोमनाथ बोरुडे,
राजेंद्र बोरुडे
व अन्य कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खेरडा रस्त्याच्या
दुरावस्तेकडे आमदार लंके यांचे लक्ष वेधले.पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे कर
निरीक्षक सोमनाथ गर्ज़े,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर
राजळे,ज्येष्ठ नेते राजेंद्र दौंड,रफिक शेख,माजी नगरसेवक बंडू बोरुडे,चांद मणियार,सिताराम बोरुडे आदी उपस्थित होते.
0 Comments