ज्ञानाची गंगा सर्वसामान्यां पर्यंत पोहचविण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले - मंगलताई म्हस्के

 

तिसगाव - ज्यांनी ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहचुन आपले आयुष्य अशिक्षित समाजाला शिक्षित करण्यासाठी घालविले असे मत शिवसेनेच्या महिला संघटक व कौडगाव-त्रिभुवनवाडी-निबोंडीच्या सरपंच सौ.मंगलताई म्हस्के यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त स्वामी विवेकानंद शाळेत बोलताना व्यक्त केले.

घरातील महिला शिकलेली असली तर कुटुंबावर चांगले संस्कार होवुन कुटुंबाची प्रगती होती आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात याचे सर्व श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना असल्याचे सांगुन सौ. म्हस्के पुढे म्हणाल्या,सावित्रीबाई फुले यांचा बालपणातच विवाह झाला. त्याकाळी बालविवाह करण्याची पध्दत होती. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना झाडाखाली बसुन शिक्षण दिले. त्याकाळी शाळा नव्हत्या. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. या शाळेत फक्त ६ मुली होत्या. शाळेत येताना त्याच्यावर लोकांनी चिखलफेक केली, नाव ठेवली पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी आपला संघर्ष चालुच ठेवला, त्या महाराष्ट्रातील नव्हे देशातील पहिल्या शिक्षिका होत्या, आदर्श मुख्याध्यापिका म्हणुन त्यांनी काम केले.आज सरपंचपदापासुन ते राष्ट्रपतीपदापर्यत महिला पोहचल्या आहेत, राजकारणातच नाही तर समाजकारण, व्यवसाय, नोकरीतील उच्च पदापर्यंत महिला काम करताना दिसतात याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंच मुनिफा शेख होत्या.या कार्यक्रमास पालक समितीच्या अध्यक्षा मिराबाई चितळे, स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषाताई पालवे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनेने हजर होते.


Post a Comment

0 Comments