पाथर्डी – नागरिकाना चांगले जीवन व्यतीत
करण्यासाठी पैश्या सोबत सुदृढ आरोग्य महत्वाचे असून स्वातंत्र्यपूर्व कालावधी पासून
देशहिताच्या चळवळीत वकिलांची भूमिका महत्त्वाची
राहिली आहे.वकिलांनी न्यायमंदिर व समाजातील गरजा ओळखून समाजकारण व राजकारणा
मधील खालावलेली
पातळी सुधारण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा व समाजाला आदर्श दिशा देण्यासाठी वकिलांनी
देशहिताच्या
चळवळीत सक्रीय व्हावे असे मत अहमदनगर जिल्हा
प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी व्यक्त केले.
पाथर्डी वकील संघ व पाथर्डी न्यायिक अधिकारी व् कर्मचारी आयोजित जिल्हास्तरीय टेनिस
बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश यार्लगड्डा यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले यावेळी यार्लगड्डा बोलत होते. यावेळी पाथर्डी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार,न्यायाधीश व्हि.आय.शेख, मयूरसिहं गौतम, वकील संघाचे अध्यक्ष अॅड राजेंद्र खेडकर, उपाध्यक्ष निलेश दातार,सचिव अयाज शेख,मोहटा देवस्थान विश्वस्त
अनुराधा केदार,डॉ. श्रीधर देशमुख आदी
उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश तथा मोहटा देवस्थानचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी
या स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. शाहिर
भारत गाडेकर यांनी पहाडी
आवाजात कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
![]() |
(विजेता पाथर्डी वकील संघ व उपविजेता नेवासा वकील संघातील खेळाडूना विजयी चषक देताना न्यायाधीश अश्विनी बिराजदार,न्यायाधीश मयूरसिंह गौतम आदी) |
यार्लगड्डा म्हणाले की, स्वातंत्रपूर्व कालावधी पासून प्रत्येक चळवळीत वकिलांचा सिंहाचा सहभाग होता.ह्या मंचावरून सध्या वकील मंडळी फेकली गेल्याने राजकारण आणि समाजकारणातून या दोन्ही मंचावर वकील मंडळीची उणीव दिसते ही उणीव भरून काढण्यासाठी वकिलांनी न्याय मंदिराततील आपली परिस्थिती सुधारून न्याय मंदिरावरील लोकांचा विश्वास पुनर स्थापित केला पाहिजे तरच समाजात आणि राजकारणात बदल होईल. क्रिकेटच्या सांघिक खेळातून वकील व न्याय व्यवस्थेतील व्यक्तींमधील एकत्रित पणा खिलाडूवृत्ती व गतिमानता हा मुख्य उद्दिष्ट असून यातूनच न्याय मंदिरातील येणाऱ्या प्रत्येक पक्षकाराला सांघिक पणाने जलद न्याय देण्याची भूमिका ठेवल्यास जनतेच्या मनात न्यायालयावरचा विश्वास आणखीन वाढेल असे यार्लगड्डा यांनी सांगितले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील वकील व न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेले एकूण १० संघ या क्रीक्रेट स्पर्धेत
सहभागी झाले होते.स्पर्धा आयोजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार तर सूत्रसंचालन अॅड नितीन वायभासे यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र खेडकर यांनी केले.पाथर्डी वकील संघ व नेवासा वकील संघात यांच्यात झालेल्या अंतिम व
अटीतटीच्या सामन्यात पाथर्डी वकील संघ अंतिम विजेता ठरला तर उपविजेता नेवासा वकील
संघ झाला.विजेत्या संघाला तसेच सामानाविराना मान्यवरांच्या हस्ते विजयी चषक,सन्मानचिन्ह
देण्यात आले.
0 Comments