शिरूर कासार - भालेश्वर
हायस्कूल,
भालगाव
ता.पाथर्डी या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.या
कार्यक्रमात कथाकार, व्यंगचित्रकार दीपक महाले
यांचे कथाकथन झाले.'सर रामूचा फोटो काढतात'
या
विनोदी कथेने विद्यार्थ्यांना खळखळून हसवले व त्यांचे प्रबोधन केले.त्यानंतर दीपक
महाले यांनी विद्यार्थ्यांना व्यंगचित्रे रेखाटून दाखवली. व्यंगचित्रकलेविषयी
माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नवनाथ
महाराज शास्त्री,मायंबागड हे होते.मंचावर
साहित्यिक अनंत कराड यांची उपस्थिती होती.पंढरीनाथ
पल्हारे यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. मुख्याध्यापक
हनुमान गोर्डे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचलन प्रवीण पाचंग यांनी तर आभार प्रदर्शन
नजन सर यांनी केले.
0 Comments