पाथर्डी – शहरातील सुवर्णकार बंडूशेठ उर्फ
राजेंद्र चिंतामणी यांच्यावर यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात
चिंतामणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात तातडीचे उपचार
सुरु असून घटना ठिकाणाहून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
बंडूशेठ चिंतामणी हे सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे त्यांचे सोन्याचे
दुकान बंद करून घरी निघाले असता त्यांचा शेवगाव रोड लगत असलेल्या ओढ्या जवळ अज्ञात
चोरट्यांनी चिंतामणी यांची दुचाकी गाडी अडवून त्यांच्या कडील पिशवी हिसकावली
त्यावेळी सुवर्णकार चिंतामणी यांनी त्यास विरोध केला असता अध्यात चोरट्यांनी
त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी चिंतामणी त्यांच्या डोक्यावर वार केले असून या
हल्ल्यात चिंतामणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथील उपजिल्हा
रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नेहमी प्रमाणे पोलिसांनी घटना घडून गेल्या नंतर घटना
ठिकाणी धाव घेतली आहे. शहरातील वाढत्या चोऱ्या व हल्ले पाहता जनते मध्ये घबराटीचे
वातावरण पसरले आहे.
0 Comments