कॉपी बहाद्दर विद्यार्थ्या कडून कॉपी पुरवणाऱ्या एजंटला बेदम चोप !

पाथर्डी - बारावी परीक्षा दरम्यान कॉपी पुरवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्या कडून ४० हजारांची सुपारी घेतलेल्या एजंटा कडून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी मिळाली नाही या कारणावरून तालुक्यातील एका शिक्षण क्षेत्रात मिरवणाऱ्या शासकीय पगारी एजंटाला पुण्या मुंबईच्या परीक्षार्थींनी रिंगणात घेवून परीक्षा केंद्रा बाहेर बेदम चोप दिला. एजंटा कडून पीडीत झालेल्या अनेकांनी यावेळी हात धुवून घेतले. तरी असे गंभीर प्रकरण नाच्चकी टाळण्यासाठी मात्र पोलीस स्टेशनच्या दारातून परत आणण्यात या रेकेटच्या लाभार्थी संस्थाचालकांना यश आले.

पालिका हद्दीत बारावीची पाच परीक्षा केंद्र आहेत. सहज व सुलभ व विनासायास दहावी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होता येते म्हणून राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातून विशेषतः पुणे, कल्याण, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी अशा भागातील विद्यार्थी कागदोपत्री येथील विशिष्ट संस्था व शाळांमध्ये एजंटाकरवी प्रवेश घेतात. प्रात्यक्षिक परीक्षा, गृहपाठ प्रात्यक्षिके व दैनंदिन हजेरीचे सुद्धा उपस्थित न राहता गुण मिळतात. परीक्षेदरम्यान कॉपी पुरवणे, रूम मिळवून देणे अशा प्रकारची कामे एजंट करतात. 

आज दुपारी बारावीचा पहिला पेपर सुटल्यावर शहरातील माणिकदौंडी रस्त्यावर बाहेर गावच्या हाय प्रोफाईल विद्यार्थ्यांनी एजंटला कॉफीच्या मुद्द्यावरून बदलून काढले. काही विद्यार्थी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले मात्र यंत्रणेतील चतुर घटकांनी तक्रार देण्यापासून विद्यार्थ्यांना परावृत केले. अजून बरीच परीक्षा बाकी असल्याने विद्यार्थ्यांनी सुद्धा समजूनदारपणा दाखवला. शहरात सध्या प्रमुख लॉज व विश्राम गृहांवर बाहेर गावचे परीक्षार्थी व पालकांची गर्दी आहे. एवढेच नव्हे तर उपनगरांमध्ये बंगला भाड्याने घेऊन काही विद्यार्थी परीक्षा कालावधीत पाथर्डीकर झाले आहेत.

झेरॉक्स केंद्रे, मोटरसायकलवर धावाधाव करत कॉपी पोहोचवणे, गर्दीच्या ठिकाणी प्रश्न कोणता आला याची माहिती घेऊन तज्ञांकडून सोडवुन आणणे. अशी काम एजंट व त्यांच्या पंटरकडून होतात. बाहेर गावचे पाहुणे पाथर्डीलाच का येतात याचे कोडे गेल्या दहा वर्षात शिक्षण विभाग, प्रशासन व पोलिसांना सुद्धा सुटत नाही. दरम्यान याबाबत गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहरातील एका विद्यालयात आज पाच कॉपी केसेस झाल्या पेपर चालू असताना कोठेही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. हाणामारी झाली नाही. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त पथकांमुळे गैरप्रकारांना बराच काळा बसलेला आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली. प्रशासनाचा संयुक्त दबाव वाढल्याने गैरप्रकार रोखले गेले. तालुक्यात एकूण बारा परिक्षा केंद्र असून 5288 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा सर्व यंत्रणाच्या संयुक्त मोहिमेमुळे परीक्षा अधिक कडक वातावरणात सुरू आहे. यामुळे कॉपीमुक्त परिक्षा अभियानाला या माध्यमातून बळकटी मिळाली.मात्र बारावी परीक्षा सुरु होताच शहरातील लॉज,हॉटेल,दारूचे दुकाने यावर परगावच्या विद्यार्थ्यांची तुंबळ गर्दी पहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments